Marathi News> टेक
Advertisement

आलिशान मर्सडिज कार मिळू शकते केवळ ५ लाखांत

तुम्ही कार खरेदी करण्याचा विचार करत आहात? तर, मग ही बातमी खास तुमच्यासाठी आहे.

आलिशान मर्सडिज कार मिळू शकते केवळ ५ लाखांत

नवी दिल्ली : तुम्ही कार खरेदी करण्याचा विचार करत आहात? तर, मग ही बातमी खास तुमच्यासाठी आहे.

आलिशान आणि लक्झरी अशी मर्सडिज कार तुम्हाला केवळ ५ लाख रुपयांत खरेदी करण्याची संधी आता उपलब्ध झाली आहे.

दिल्लीच्या उत्पादन शुल्क विभागाने ४५० आलिशान गाड्या लिलावासाठी काढल्या आहेत. या गाड्या अवैध दारुसोबत जप्त करण्यात आल्या होत्या.

लिलावात काढलेल्या या गाड्यांमध्ये दोन वर्ष जुनी मर्सडिज कारचा समावेश आहे. ही मर्सडिज बेंज (ई-३५०) असून तिची एक्स-शोरुम किंमत ८० लाख रुपये आहे.

हा लिलाव ऑनलाईन पद्धतीने होणार असून सुरुवाती बोली ५ लाख रुपयांपासून सुरु होत आहे. लिलावात मर्सडिजसोबतच टोयोटा कोरोला, होंडा सीआरव्ही, होंडा सीटी आणि इन्होवा या कार्सचाही समावेश आहे.

या लिलाव प्रक्रियेत कुठलीही व्यक्ती सहभाग घेऊ शकते. यासाठी ई-कॉमर्स वेबसाईट मेटल स्क्रॅप ट्रेड कॉर्पोरेशन लिमिटेड (एम.एस.टी.सी.) वर रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे. एम.एस.टी.सी हा भारत सरकारचा एक उपक्रम आहे जो ऑनलाईन लिलाव प्रक्रिया आयोजित करतं.

Read More