Marathi News> ठाणे
Advertisement

उल्हासनगरमध्ये दिड लाखांचा अमली पदार्थांचा साठा जप्त

याप्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. 

उल्हासनगरमध्ये दिड लाखांचा अमली पदार्थांचा साठा जप्त

उल्हासनगर : उल्हासनगर गुन्हे अन्वेषन विभागाकडून मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आहे. सुमारे दिड लाख रुपये किंमतीचे अमली पदार्थ पोलिसांच्या उल्हासनगर गुन्हे अन्वेषन विभागाने जप्त केले आहेत. या प्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. 

हिललाईन पोलीस स्टेशनच्या हद्दीतील डावलपाडा नेवाळी येथील एका घरावर धाड टाकून अमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. या अमली पदार्थांमध्ये गांजा तसेच नशा येण्यासाठी वापरण्यात येणारे रेक्राँस आणि फेनक्रेक्स नावाचा कफ सिरप जप्त करण्यात आला आहे. या अमली पदार्थांची एकुण किंमती १ लाख ५८ हजार ३९० रुपये इतकी आहे. 

अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या गुलाम सरवार मकसुद अहमद खान या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी उल्हासनगर न्यायालयाकडून आरोपीला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

Read More