Marathi News> ठाणे
Advertisement

Kalyan News: कल्याण डोंबिवलीतील 65 इमारतींवरील कारवाई प्रकरणी बावनकुळेंची बैठक, नेमकं काय घडलं?

कल्याण डोंबिवलीतील 65 इमारतींवर कारवाई प्रकरणी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची बैठक. 

Kalyan News: कल्याण डोंबिवलीतील 65 इमारतींवरील कारवाई प्रकरणी बावनकुळेंची बैठक, नेमकं काय घडलं?

Kalyan Dombivli News Today : कल्याण डोंबिवलीतील 65 इमारतींमधील तोडगा काढण्यासाठी भाजप आमदार रविंद चव्हाण यांनी मंत्रालयात बैठकीचे आयोजन केले होते महसूलमंत्री चंद्रशेखर बावकुळे यांच्या सोबत बैठक पार पाडली. या बैठकीत कल्याण डोंबिवली महापालिकेचे आय़ुक्त,  ठाणे, रायगड, पालघर व मुंबई शहरचे जिल्हाधिकारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली येत्या चार दिवसात चारही विभागांच्या संबंधित अधिकाऱ्यांची एकत्रित बैठक आयोजित करण्यात येणार आहे. 

कल्याण डोंबिवलीतील 65 इमारतींच्या प्रश्नावर सकारात्मक मार्ग काढण्याच्या दृष्टीने कल्याण डोंबिवली आयुक्त, नगरविकास विभाग, जिल्हाधिकारी व महारेरा या चारही विभागांशी संबधित अधिकाऱ्यांशी बैठक घेऊन या विषयासंदर्भात सविस्तर माहिती सादर करावी व सविस्तर अहवाल सादर करावा. त्या अनुषंगाने प्रस्ताव तयार करण्यात यावा. हा विषय मंत्रिमंडळ बैठकीत मांडण्यात येईल. असे आश्वासनही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी दिले.

एकही रहिवासी बेघर होणार नाही

कल्याण-डोंबिवली 65 इमारती प्रकरणी रविंद्र चव्हाण यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यावेळी ते म्हणाले की, 65 इमारतीमधील एकही रहिवासी बेघर होणार नाही. हा प्रश्न खूप गंभीर आहे. त्यामुळे कल्याण डोंबिवली आयुक्त, नगरविकास विभाग, जिल्हाधिकारी व महारेरा या चारही विभागांमधील संबंधित अधिकाऱ्यांनी बैठक घेऊन या विषयी सविस्तर माहिती सादर करावी. त्यासोबतच हा विषय लवकर मार्ग लावला. हजारो रहिवाश्यांना न्याय मिळण्याच्यादृष्टीने शासन स्तरावर मार्ग काढण्याची मागणी रविंद्र चव्हाण यांनी केली आहे. 

एमपीडीए अंतर्गत कारवाई होणार ?

65 बेकायदा इमारत बांधकाम प्रकरणात बनावट सातबारा ,बनावट एन ए प्रकरणी तहसीलदारांच्या आदेशानंतर रामनगर पोलीस ठाण्यात साई गॅलेक्सी इमारतीचे बिल्डर शालीन भगत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या शालेय भगतचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळल्याची माहिती ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी दिली याबाबत म्हात्रे यांनी डीसीपी पराग मनेरे यांची भेट घेत शालीन भगत हा प्यादा आहे. त्याच्या मागचा प्रमुख आरोपी अटक झाली पाहिजे अशी मागणी केल्याचे सांगितले . पुढे बोलताना 65 बेकायदा बांधकाम प्रकरणात संबंधित बिल्डरानी खोटे कागदपत्र तयार करणाऱ्या टोळीवर एमपीडीए कारवाई होणार असल्याची माहिती शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांनी दिली आहे. 

Read More