Marathi News> विदर्भ
Advertisement

Big Family : घर आहे की गाव? 51 सदस्य असलेली ही भली मोठी Joint Family पाहिली का?

तब्बल 51 जण एकाच कुटुंबात गुण्या गोविंदाने राहत आहेत. पुरुष मंडळी शेतीची कामे पाहतात. घरातील महिला घर सांभाळतात.  एका वेळच्या जेवणात सहा किलो तांदूळ, चार किलोची भाजी बनवली जाते. 

Big  Family : घर आहे की गाव? 51 सदस्य असलेली ही भली मोठी Joint Family पाहिली का?

आशीष अम्बाडे, झी मीडिया, गडचिरोली : हम दो हमारे दो असे काहीसे चित्र आता जवळपास सर्व ठिकाणी पहायला मिळते. पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती अस्तित्वात होती. आता मात्र, लग्न झाली की भावडं आपला वेगळा संसार थाटतात.  गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यातील कोरची या अतिदुर्गम तालुक्यातील सोहले गावात 6 भावांचे एक संयुक्त कुटुंब अस्तित्वात आहे. 51 सदस्य असलेली ही भली मोठी Joint Family सध्या चर्चेचा विषय आहे. या कुटुंबाकडे 40 एकर शेती असून शेतीवरच या संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह होतो. 

6 भावांचे एक संयुक्त कुटुंब 

गडचिरोली जिल्ह्यातील कोरची या अतिदुर्गम तालुक्यातील सोहले गावात 6 भावांचे एक संयुक्त कुटुंब आहे.  असून घरातील एकूण सदस्यांची संख्या 51 आहे. संपूर्ण शेती व्यवसायावर अवलंबून असलेल्या या कुटुंबात आई-वडील देवाघरी गेल्यानंतरही परिवार गोकुळाप्रमाणे एकत्रित आहे. शकले पडत चाललेल्या आपल्या आसपासच्या कुटुंब व्यवस्थेत गंगाकुचर भावंडांनी व ज्यांच्या सहचारिणींनी हे संयुक्त कुटुंब व्यवस्था शक्य करून दाखविली आहे.  केवळ पाचशे लोकसंख्येच्या सोहले गावातील गंगाकुचर परिवार आपसातील बंधुभाव व एकीमुळे चर्चेत आहे.  कुवरसिंग गंगाकुचर आणि धनीबाई गंगाकुचर यांचे हे कुटुंब. कुवरसिंग 105 वर्षांचे आयुष्य जगले तर धनीबाई यांना 110 वर्षांचे आयुष्य लाभले. धनीबाई यांचे नुकतेच निधन झाले. दोघांना सहा मुले व दोन मुली अशी अपत्ये झालीत.

40 एकर शेती आणि 60 गुरे

या कुटुंबाकडे एकूण  ४० एकर शेती आहे. घरात एक ट्रॅक्टर, चार मोटारसायकल आहेत. तर गोठयात 60 गुरे आहेत. एका भावाचे निधन झाल्यावर पाच भाऊ, त्यांच्या पत्नी, सहा भावांची 13 मुले, 13 पत्नी, आठपैकी 3 अविवाहित मुली, डझनभर नातवंडे असे 51 जणांचे कुटुंब सोहले गावातील वाडेवजा घरात एकत्रित राहतात. 

तीन हजारांचा भाजीपाला आणि 13 हजार रुपयांचा किराणा

आठवड्याला या कुटुंबाला तीन हजारांचा भाजीपाला लागतो. किराणासाठी 13 हजार रुपये खर्च येतो.  एका वेळच्या जेवणात सहा किलो तांदूळ, चार किलोची भाजी लागते. जागतिक कुटुंब दिनानिमित्त या गंगाकुचर परिवाराने एकत्रित कुटुंबपद्धतीचा घालून दिलेला आदर्श इतरांसाठी अभ्यासण्यासारखा आहे.

 

Read More