मुंबई : उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना देशभरातून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. तर समर्थकांकडूनही शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे. मात्र या सगळ्यात चर्चा आहे ती त्यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी केलेल्या हटके ट्वीटची.
देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी जिलेबी भरवतानाचा फोटो शेअर केला. या फोटोसोबत त्यांनी हटके कॅप्शन दिलं आहे. ''जिलेबी कितीही आडवळणी असो, तिची चव कायम गोडच असते. ''
''अगदी त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या जनतेच्या हितासाठी कितीही आडवळणे आली तरी, अडथळ्यांची शर्यत पार करीत, त्यातून सुखद वाट सातत्याने शोधत-कायम विकासाचा गोडवा पसरविणारे देवेंद्र फडणवीसजी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा ! ''
जिलेबी कितीही आडवळणी असो, तिची चव कायम गोडच असते.
— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) July 22, 2022
अगदी त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या जनतेच्या हितासाठी कितीही आडवळणे आली तरी, अडथळ्यांची शर्यत पार करीत, त्यातून सुखद वाट सातत्याने शोधत-कायम विकासाचा गोडवा पसरविणारे @Dev_Fadnavis जी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा !#Devendra_Fadnavis pic.twitter.com/bHtz03Eo9Q
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील ट्वीट करून देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. @Dev_Fadnavis जी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) July 22, 2022
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सागर निवासस्थानी आमदार प्रवीण दरेकर, गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत यांनी त्यांची भेट घेतली. तर शिंदे गटातील आमदार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी संजय राठोड, दादा भुसे, संदीपने भुमरे यांनीही भेटून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.