Maharashtra Weather : राज्यातील बहुतांश भागात तापमानाचा पारा चाळिशीपार गेला आहे विदर्भात मात्र उष्णतेने कहर केल्याचं चित्र आहे. देशात सर्वाधिक तापमानाची नोंद चंद्रपुरात झाली आहे. चंद्रपूरात आज 45.6 अंश एवढी तापमानाची नोंद झालीये. राज्यात गेल्या काही दिवसांत तापमानाचा पारा चाळीशी पार गेलाय.
चंद्रपुरात सूर्याचा प्रकोप, आज नोंदले गेले देशातील सर्वाधिक तापमान , 45.6 अंश सेल्सियस तापमान या हंगामातील सर्वोच्च तापमान, कालच्या तापमानात पूर्ण 1 डिग्री ची वाढ, प्रशासनाने 24 एप्रिल पर्यंत उष्णतेच्या लाटेचा दिला इशारा, नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नागपूर - 43.06
अमरावती - 44.06
चंद्रपूर - 45.06
अकोला, - 44.०१
वर्धा, - ४३.०४
बुलढाणा, - ३९.०८
यवतमाळ, - ४३.०४
भंडारा, - ४१.०४
गोंदिया, - ४२.०१
वाशिम, - ४२,०५
गडचिरोली - ४३.००
पुरेसे पाणी प्या, शरीरातील पाण्याची पातळी योग्य राखा
घराबाहेर पडतांना डोके झाकण्यासाठी टोपी, रुमाल किंवा छत्रीचा वापर करावा
दुपारी 12 ते 4 वाजेदरम्यान घराबाहेर जाणे टाळावे
थेट येणाऱ्या सुर्यप्रकाशाला/उन्हाला अडविण्याकरिता घरातील पडदे आणि झडपांचा वापर करावा
उष्णतेच्या लाटेच्या माहितीसाठी रेडिओ, टिव्ही, किंवा वर्तमानपत्रातील माहितीचा वापर करण्यात यावा
हलकी, पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरावेत