Marathi News> विदर्भ
Advertisement

Nagpur: नागपूरचे जुने नाव 99 टक्के लोकांना महित नाही? 1085 वर्ष जुना इतिहास

नागपूरचे जुने नाव माहित आहे. यामागे  1085 वर्ष जुना इतिहास आहे. जाणून घेऊया नागपूरचे जुने नाव

Nagpur: नागपूरचे जुने नाव 99 टक्के लोकांना महित नाही? 1085 वर्ष जुना इतिहास

Nagpur City Old Name : नागपूर हे शहर महाराष्ट्राची उपराजधानी म्हणून ओखळले जाते. तसेच नागपूर महाराष्ट्राचे प्रमुख औद्योगिक केंद्र आहे. नागपूरची म्हणजे ऑरेंज सिटी जगप्रसिद्ध आहे. नापूर कॅपिटल ऑफ टायगर म्हणूनही प्रसिद्ध आहे. तसेच दिक्षाभूमीमुळे देखील नागपूरला वेगळी ओळख मिळाली. नागपूर हे सध्या महाराष्ट्रातील झपाट्याने विकसीत होणारे शहर आहे. पण, तुम्हाला  नागपूरचे जुने नाव माहित आहे. नागपूरचे जुने नाव इतिहास जाणून घ्यायचा असेल तर  नागपूरचे जुने नाव मागे जावं लागले. 

मुंबई आणि पुण्यानंतर महाराष्ट्रातील तिसरे मोठे शहर आहे. नागपूरचा सर्वप्रथम उल्लेख दहाव्या शतकातील ताम्रपटावर आढळतो. इ.स. 940 मध्ये देवळी येथे हा ताम्रपट सापडला होता. गोंड राजा बख्त बुलंदशहा याने नाग नदीच्या तीरावर हे शहर वसवले होते. नाग नदी नागासारखीच वाहते, म्हणूनच तिला 'नाग' असे नाव देण्यात आले आहे. या नदीमुळेच शहराचे नाव नाग असे पडले. कालांतराने नाग हे नाव नागपूर म्हणून प्रचलित झाले. 

19 व्या शतकात ब्रिटिशांच्या ईस्ट इंडिया कंपनीने  या शहराची सूत्रे आपल्या हातात घेतली. सेंट्रल प्रोव्हिअन्स अॅण्ड बेरारची राजधानी म्हणून नागपूरची घोषणा करण्यात आली. मात्र, कालांतराने मुंबई हे शहर महाराष्ट्राची पाधानी बनले. 
नागपूर हे विदर्भातील महत्त्वाचे व्यावसायिक केंद्र आहे. अलीकडील काही वर्षात नागपूरात गुंतवणूक वाढत असून येथील अर्थव्यवस्था विस्तारत आहे. उद्योगाप्राणेच नागपूर हे पर्यटन केंद्र म्हणूनही ओळखले जाते. दीक्षाभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लाखो अनुयायांसोबत बौद्ध धर्म स्वीकारला होता. यामुळे लाखो अनुयायी वर्षभर दीक्षाभूमिला भेट देतात. कामठी येथील ड्रॅगन पॅलेस टेंपलमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे विपश्यना केंद्र आहे.  टेकडी गणेश मंदिर, बेसातील गुरूमंदिर, साई मंदिर, बालाजी देवस्थान, कोराडीतील देवी मंदिर, पारडीतील भवानी देवी मंदिरासह छोटी मोठी 1240 धार्मिक स्थळे नागपूरमध्ये आहेत. 

Read More