Marathi News> विदर्भ
Advertisement

'पगार काढून देतो पण...'; हक्काचे पैसे मिळवून देण्यासाठी महिलेकडे शरीर सुखाची मागणी

हक्काचा कामाचा पगार रखडला. तोच मिळवून देण्यासाठी दोन उपविभागीय अभियंताची महिलेकडे शारीरिक सुखाची मागणी. 

'पगार काढून देतो पण...'; हक्काचे पैसे मिळवून देण्यासाठी महिलेकडे शरीर सुखाची मागणी

जयेश जगड, झी मीडिया, अकोला : विधान सभेचे अध्यक्ष आरोपींना मेनेज झाले असल्याचा आरोप UBT चे आमदार नितीन देशमुख यांनी लगावला आहे. अकोला जिल्ह्यातील मुर्तीजापुर येथे जीवन प्राधिकरण कार्यालयात कम्प्युटर ऑपरेटर पदावर कंत्राटवर असलेल्या एका महिलेला पगार काढून देण्यासाठी शारीरिक सुखाची मागणी करणाऱ्या दोन अधिकाऱ्यांवर अद्यापही निलंबनाची कारवाई झाली नसल्याने आमदार नितीन देशमुख यांनी अकोला येथील जीवन प्राधिकरणच्या मुख्य कार्यालयात कार्यकर्त्यांसोबत ठिय्या आंदोलन पुकारला.

काय आहे प्रकरण ?

अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथे जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयात कंत्राटी पद्धतीवर महिला कार्यरत होती. अनेक महिने उलटूनही या महिलेचा पगार झाला नव्हता, तुझा पगार आम्ही काढून देतो असल्याचं म्हणत मुर्तीजापुर उपविभागीय अभियंता डी.बी कपिले आणि शाखा अभियंता राजेंद्र इंगोले यांनी महिलेला शारीरिक सुखाची मागणी केली. मात्र महिलेने विरोध केल्याने तिला कार्यालयीन त्रास देण्यास अधिकाऱ्यांनी सुरू केलं. न्याय हक्कासाठी महिलेने काही महिने आधी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करीत दाद मागितली होती. मात्र चौकशी करून अधिकाऱ्यांवर कारवाईचा आश्वासन त्यावेळेस देण्यात आला होता..

अद्यापही महिलेला न्याय मिळाला नाही म्हणून...

या संदर्भात अधिकाऱ्यांवर कारवाई करून महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी विधानसभेत लक्षवेधी साठी नितीन देशमुख यांनी पत्र दिलं असतानाही लक्षवेधी लावण्यात आली नसून विधानसभा अध्यक्ष कुंभकरण झोपेत असल्याची टीका त्यांनी केली आहे.विरोधकांनी लावलेली लक्षवेधी सभागृहात घेण्यात येत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली आहे. तर पीडित महिलेला न्याय मिळत नाही तोपर्यंत कार्यालय सोडणार नसल्याचा पवित्रा नितीन देशमुख  यांनी घेतला.

Read More