रत्नागिरी । चिपळूणमध्ये धरण फुटल्याने मृत्यूचे तांडव
रत्नागिरीच्या चिपळूण तालुक्यातील तिवरे गावातील धरण फुटल्याने १२ ते १५ घरे वाहून गेली आहेत. या दुर्घटनेमध्ये ११ जण ठार झाले आहेत. तर १३ जण बेपत्ता झाले आहेत. या दुर्घटनेला सर्वस्वी पाटबंधारे विभाग जबाबदार असल्याचा आरोप या दुर्घटनेत बेपत्ता झालेल्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. कारण गेली २ वर्षे या धरणाला गळती लागली होती. याबाबत वारंवार प्रशासनाकडे तक्रारी करण्यात आल्या. मात्र, केवळ मलमपट्टी या गळतीवर करण्यात आली. त्यामुळे या दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी नातेवाईकांकडून होत आहे. या घटनेला स्थानिकांनी प्रशासनाला जबाबदार घरले आहे. आम्ही वारंवार पत्रव्यवहार करूनही पाटबंधारे विभागाने दुर्लक्ष केल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. मंगळवारी रात्री ९ च्या दरम्यान माणसं जेवायला बसली होती, ती तशीच वाहून गेली. प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरू आहे.

|Updated: Jul 03, 2019, 03:50 PM IST