भारतीयांचे अफाट क्रिकेटप्रेम भारतात क्रिकेटर्सना देवासमान मानले जाते. लोक क्रिकेटर्सच्या पर्सनल लाईफमध्येही बराच रस घेतात. चला तर पाहूया या क्रिकेटर्सनी कितविपर्यंत शिक्षण घेतलं आहे.
Aug 31, 2023
विराट कोहली भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली हा फक्त 12 वी पर्यंत शिकलाय. क्रिकेटमुळं विराटला त्याचं शिक्षण पूर्ण करता आलं नाही.
अनिल कुंबळे अनिल कुंबळे सर्वात जास्त शिकलेल्या खेळाडूंपैकी एक आहे. कुंबळेने RV कॉलेज ऑफ एंजिनियरिंग मधून मेकॅनिकल एंजिनियरिंगची पदवी घेतली आहे.
एम एस धोनी धोनी तिकिट कलेक्टर होता हे तर सर्वज्ञात आहेच; पण कॅप्टन कूलने वाणिज्य शाखेतनं पदविही घेतली आहे.
सूर्यकुमार यादव सूर्यानं पिल्लई महाविद्यालयातून वाणिज्य शाखेची पदवी घेतली आहे.
रोहित शर्मा भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहितनं क्रिकेटसाठी त्याचं उच्चशिक्षण पूर्ण केलं नाही. तो 10 वी पर्यंतच शिकला.
सचिन तेंडुलकर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं वयाच्या 16 व्या वर्षी क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानं त्याने 12 वी पर्यंतच शिक्षण घेतलं.
शिखर धवन शिखरनंही क्रिकेट खेळण्याकरता 12 वी नंतर शिक्षण सोडून दिलं.
हार्दिक पांड्या टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर हार्दिक पांड्यानं पूर्णवेळ क्रिकेट खेळण्यासाठी 8 वीतच शिक्षण सोडलं.
सौरव गांगुली 'दादा' नी कोलकत्त्याच्या सेंट झेवियर्स कॉलेजमधून वाणिज्य शाखेची पदवी घेतली आहे. (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)