घटस्फोटानंतर प्रतीकला डेट करतेय धनश्री? कोरियोग्राफरने स्पष्टच सांगितलं

Pooja Pawar
Aug 07, 2025


क्रिकेटर युझवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा या दोघांचा काही महिन्यांपूर्वी घटस्फोट झाला. 20 मार्च 2025 रोजी दोघे विभक्त झाले.


घटस्फोटानंतर युझवेंद्र चहलचं नाव हे RJ महवश सोबत जोडलं गेलं तर धनश्री वर्मा सुद्धा रिलेशनशीपमध्ये असल्याचं समोर आलं आहे.


2025 च्या सुरुवातीला धनश्री वर्माचा कोरियोग्राफर प्रतीक उतेकर सोबत एक फोटो व्हायरल झाला होता. यात दोघे एकमेकांना मिठी मारताना दिसले.


सोशल मीडियावर दोघांचाही हाच फोटो व्हायरल होत असून धनश्री वर्मा आणि प्रतीक उतेकर एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.


सोशल मीडियावर चर्चांना उधाण आल्यावर कोरियोग्राफर प्रतीक उतेकरने स्वतः आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून याबाबत त्याची भूमिका मांडली आहे.


प्रतीकने लिहिले की, 'जग एवढं स्वतंत्र आहे गोष्टी तयार करण्यात, कमेंट करण्यात, तिचा फोटो DM करण्यात, कृपया मित्रांनो समजूतदार व्हा!'


प्रतीक उतेकर हा मुंबईतील कोरियोग्राफर असून त्याने आतापर्यंत अनेक मोठ्या बॉलिवूड सेलिब्रिटींसोबत काम केलंय. तसेच तो काही रिऍलिटी शो चा सुद्धा भाग राहिलाय.

Read Next Story