नारळाचं तेल हे त्वचेसाठी, केसांसाठी आणि आरोग्यासाठी सुद्धा चांगलं असतं. त्यामुळे याच्या मागणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे.
मागणी वाढल्याने बाजारात अनेक ठिकाणी भेसळयुक्त नारळाच्या तेलाची सुद्धा विक्री केली जाते. तेव्हा यातील शुद्ध नारळाचं तेल ओळखायचं कसं याबाबत जाणून घेऊयात.
भेसळयुक्त नारळाचं तेल हे त्वचेसह केसांना सुद्धा हानी पोहोचवत.
नारळाचं तेल शुद्ध आहे की नाही हे तपासण्यासाठी तुम्ही थंड पाण्यात एक चमचा तेल टाकून 30 मिनिटांसाठी ठेऊन द्या. जर तेल पाण्यासोबत मिक्स झालं तर हे तेल भेसळयुक्त असू शकतं.
नारळाचे एका वाटीत ठेऊन ते जवळपास एक तास फ्रिजमध्ये ठेवा. जर ते शुद्ध असेल तर नारळाचं तेल गोठेल पण जर त्यात कोणती भेसळ केली असेल तर ते तेल गोठणार नाही.
एक पॅन घेऊन त्यावर नारळाचं तेल टाका. जर त्यातून बुडबुडे निघाले किंवा जळण्याचा वास आला तर तेल भेसळयुक्त आहे असं समजावं.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)