French Fries फ्रान्समधील पदार्थ नाही, मग त्याला फ्रेंच नाव कसं पडलं?
Pooja Pawar
Jun 23, 2025
बर्गर, पिझ्झा सोबत तुम्ही बऱ्याचदा फ्रेंच फ्राईज खाण्याचा आनंद घेतला असेल. सध्या फ्रेंच फ्राईजमध्ये अनेक व्हरायटी सुद्धा येते.
पण तुम्हाला माहितीये का की फ्रेंच फ्राईज बनवण्याची आयडिया कोणाला आली आणि हे फ्राईज आधी कुठे बनवण्यात आले?
फ्रेंच फ्राईजच्या नावातच फ्रेंच आहे त्यामुळे फ्रान्समधील लोकांना वाटतं की हा पदार्थ सर्वप्रथम आपल्याकडे बनवण्यात आला होता.
पण फ्रान्सचं शेजारील राष्ट्र असलेल्या बेल्जियमचं म्हणणं आहे की फ्रेंच फ्राईज पहिल्यांदा बेल्जियममध्ये बनवले गेले.
BBC च्या एका रिपोर्टनुसार फ्रेंच फ्राईज या पदार्थचा जन्म 1680 साली बेल्जियममध्ये झाला. ही गोष्ट तेथील नामूर नदीशी जोडलेली आहे.
नामूर नदीच्या जवळ राहणारे रहिवासी नदीतील मासे पकडून आणायचे आणि ते तळून खायचे. मात्र एकदा हिवाळ्यात ही नदी गोठली.
तेव्हा नदी काठच्या रहिवाशांनी बटाट्याचे उभे पातळ काप करून ते तळले. ज्याला आपण आज फ्रेंच फ्राईज असं म्हणतो. बेल्जियममध्ये याला बेल्जियम फ्राईज असं म्हटलं जातं.
फ्रेंच फ्राईज हे नाव फ्रान्स या देशाला नाही तर त्याच्या बनवण्याच्या प्रक्रियेला दर्शवते. "फ्रेंचिंग" ही स्वयंपाकासाठी लागणारे साहित्य कापण्याची एक पद्धत आहे, ज्यामध्ये एक पदार्थ एकसमान कट करून सर्व बाजूंनी तळून घेतला जातो.