ठरलं! प्राजक्ता गायकवाड लवकरच अडकणार विवाहबंधनात, शेअर केले खास फोटो

Soneshwar Patil
Aug 01, 2025


'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे.


नुकतीच अभिनेत्रीने साखरपुड्याचे फोटो शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.


अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर चार फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये तिचे खास नातेवाईक बघायला मिळत आहेत.


या फोटोंमध्ये अभिनेत्री खास लूक केला असून सुंदर आणि आकर्षक दागिने परिधान केले आहेत.


तर या फोटोंमध्ये अभिनेत्री सर्व पाहुण्यांना हात जोडून नमस्कार करताना दिसत आहे. तिचा हा लूक खूपच व्हायरल होत आहे.


तिने हे फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये, प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा... ठरलं! असं म्हटलं आहे.


आता प्राजक्ताचा होणारा नवरा कोण आहे याबाबत चाहत्यांना प्रचंड उत्सुकता लागली आहे.

Read Next Story