'ही' लक्षणं सांगतात किडनीला झालं आहे इन्फेक्शन!

user Tejashree Gaikwad
user Jun 22, 2025


किडनीच्या संसर्गाला वैद्यकीय भाषेत पायलोनेफ्रायटिस म्हणतात.


हे मूत्रमार्गाच्या संसर्गाच्या (UTI) प्रसारामुळे होते आणि वेळेवर उपचार न केल्यास ते गंभीर रूप धारण करू शकते.


मूत्रपिंडाच्या संसर्गामुळे 102°F किंवा त्याहून अधिक तापमानाचा अचानक,जास्त वेळासाठी ताप येऊ शकतो.


विशेषतः कंबरेच्या एका बाजूला जास्त दुखत असेल तर ते अंतर्गत जळजळ होण्याचे लक्षण असू शकते.


लघवी करताना जळजळ, डंक येणे किंवा वेदना होणे हे संसर्गाचे प्रारंभिक लक्षण आहे.


संसर्गामुळे लघवीला दुर्गंधी येऊ लागते आणि त्याचा रंगही डार्क होऊ शकतो.


(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. )

Read Next Story