भौगोलिक रचना अद्वितीय भौगोलिक रचना, रखरखीत तरीही मनाला भावणारे डोंगर आणि अंगाला झोंबणारा गार वारा... लडाख म्हटलं की हेच चित्र समोर येतं.
सफर दरवर्षी मोठ्या संख्येनं भारतीय आणि परदेशी पर्यटक या लडाखच्या सफरीवर येतात.
लडाख सर्वांच्याच मनाला भावणाऱ्या या ठिकाणाचा अर्थात लडाख या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहितीये का?
तिबेटन शब्द लडाख हा मूळचा तिबेटन शब्द असून तो दोन शब्दांच्या एकत्रिकरणातून तयार झाला आहे.
दाख म्हणजे... लडाख म्हणजे ला अर्थात दऱ्या खोरं आणि दाख म्हणजे पर्वतीय प्रदेश. असंख्य दऱ्याखोऱ्यांचा पर्वतीय प्रदेश, म्हणजेच 'लडाख'.
आव्हानात्मक रस्ते लडाखमध्ये अनेक आव्हानात्मक रस्ते असून, त्या रस्त्यांनी जात असताना हा प्रदेश प्रत्यक्षात मानवी स्वभावाचा, संयमाचा अंतच पाहतो याची अनुभूती येते.
लिटील तिबेट लडाखला 'लिटील तिबेट' असंही म्हणतात. येथील भाषेपासून ते खाद्यसंस्कृतीपर्यंत तिबेटन संस्कृतीचा प्रभाव दिसून येतो.