नर्सना ‘सिस्टर’च का म्हणतात? या नावामगचा इतिहास अतिशय रंजक
Aug 07, 2025
रुग्णालयं रुग्णालयं किंवा एखादा दवाखाना पाहिला की तिथं रुग्णसेवा करणाऱ्या परिचारिकांचे श्रम पाहून अप्रूप वाटतं.
मेहनत रुग्णासाठी त्या घेत असणारी मेहनत ही शब्दांतही मांडता येणार नाही अशीच. याच परिचारिकांना अर्थात नर्सना खरा मान मिळवून दिला तो म्हणजे फ्लोरेंस नाइटिंगेल या ब्रिटीश महिलेनं, ज्यांना आधुनिक नर्सिंगची जननी म्हटलं जातं.
फ्लोरेंस नाइटिंगेल 1854 च्या युद्धात फ्लोरेंस नाइटिंगेल सहभागी होऊ इच्छित होत्या, पण त्यांना तशी परवानगी मिळाली नाही.
नर्स युद्धात प्रत्यक्ष सहभागी होण्याची परवानगी न मिळाल्यानं त्यांनी या जखमी जवानांची सेवा करण्याचा निर्णय घेत नर्स म्हणून काम पाहिलं.
सेवा प्रचंड आत्मियता आणि आपुलकीनं त्यांनी जवानांची सेवा केली आणि याच जवानांनी त्यांना आदरानं ‘सिस्टर’ म्हणण्यास सुरुवात केली. इथूनच नर्सना सिस्टर म्हटलं जाऊ लागलं.
रुग्णसेवेचा वसा दिवस असो वा रात्र रुग्णसेवेचा वसा त्यांनी टाकला नाही, रात्रीच्या अंधारातही हाती दिवा घेऊन त्या रुग्णांवर उपचार करत ज्यामुळं त्यांना ‘लेडी विथ द लॅम्प’ही म्हटलं जाऊ लागलं.
सिस्टर परिचारिकांच्या या क्षेत्रात फ्लोरेंस नाइटिंगेल म्हणजे एक आदर्श ठरल्या आणि त्यांच्याचमुळं परिचारिकांना जागतिक स्तरावर 'सिस्टर'च संबोधलं जाऊ लागलं.