Marathi News> पश्चिम महाराष्ट्र
Advertisement

VIDEO: लोखंडी होर्डिंग कोसळतानाचा थरारक व्हीडिओ

होर्डिंगचा सांगाडा कापून काढत असताना हा अपघात झाला.

VIDEO: लोखंडी होर्डिंग कोसळतानाचा थरारक व्हीडिओ

पुणे: पुण्यात लोखंडी होर्डिंगचा सांगाडा कोसळून झालेल्या दुर्घटनेचा थरारक व्हीडिओ समोर आला आहे. हा व्हीडिओ पाहून ही दुर्घटना किती भीषण होती, याची कल्पना येऊ शकते. एकूणच हा व्हीडिओ अंगावर शहारे आणणारा आहे. 
 
सीसीटीव्ही फुटेजमध्ये चौकातील सिग्नलवर वाहने थांबल्याचे दिसत आहे. त्याचवेळी क्षणार्धात होर्डिंगचा लोखंडी सांगाडा या वाहनांवर येऊन कोसळला. हा आघात इतका जोरदार होता की, लोखंडी सांगाडा कोसळ्यानंतर दुचाकीस्वार नुसत्या कंपामुळेच जमिनीवर कोसळले. तर रिक्षांचा क्षणार्धात चक्काचूर झाला. 

पुण्यातील मंगळवार पेठेतील जुना बाजार परिसरात हा प्रकार घडला. रेल्वे प्रशासनाने संबंधित ठेकेदाराला हे होर्डिंग उतरवण्याचे आदेश दिले होते. होर्डिंगचा सांगाडा कापून काढत असताना हा अपघात झाला. यामध्ये तिघांचा मृत्यू झाला असून आठ जण जखमी झाले आहेत.

Read More