Marathi News> पश्चिम महाराष्ट्र
Advertisement

दाभोलकरांच्या हत्येच्यावेळी पुलावर आणखी दोघेजण होते- सीबीआय

'हेच दाभोलकर आहेत का'?, याची खात्री करुन घेतली.

दाभोलकरांच्या हत्येच्यावेळी पुलावर आणखी दोघेजण होते- सीबीआय

पुणे: डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या कटात आणखी दोघांचा सहभाग असून त्यांच्या मदतीने ही हत्या झाल्याची नवी माहिती सीबीआयच्या तपासात समोर आली आहे. सीबीआयने शनिवारी न्यायालयात ही माहिती दिली. 

ज्या ओंकारेश्वर पुलावर दाभोलकरांची हत्या झाली त्या पुलावर दाभोलकरांना ओळखणारे दोघे जण आधीच पोहोचले होते. त्यानंतर शरद कळसकर आणि सचिन अंदुरे त्याठिकाणी आले. त्यांनी अगोदरच त्याठिकाणी असलेल्या दोघांकडून 'हेच दाभोलकर आहेत का'?, याची खात्री करुन घेतली. त्यानंतर दोघांनी दाभोलकरांवर गोळ्या झाडल्या. त्या दोन्ही आरोपींचा शोध घ्यायचा असून यासाठीच शरद कळसकरची कोठडी वाढवून द्यावी, असे सीबीआयच्या वतीने न्यायालयात सांगण्यात आले.

Read More