Marathi News> पश्चिम महाराष्ट्र
Advertisement

नुसता डंपर चालवून काही होत नाही, शिवेंद्रसिंह राजेंचा उदयनराजेंना टोला

नवीन डंपरमधून शहरात उदयनराजेंनी फेरफटका मारला होता.

 नुसता डंपर चालवून काही होत नाही, शिवेंद्रसिंह राजेंचा उदयनराजेंना टोला

सातारा: आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज चक्क साताऱ्यातील मुख्य रस्त्यावरील खड्डे भरले.  खा.उदयनराजे भोसले यांच्या ताब्यात असलेल्या सातारा नगरपालिकेकडून खड्डे बुजवले जात नसल्याने आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी स्वखर्चाने साताऱ्यातील नेताजी सुभाषचंद्र भोस चौकातील खड्डे बुजवले. 
 
 यावेळी बोलताना आमदारांनी खासदार उदयनराजे यांच्यावर टीका करत नुसता डंपर चालवून शहरातील प्रश्न सुटत नसल्याचा टोला आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी लगावला. 
 
 काही दिवसांपूर्वी सातारा नगरपरिषदेने शहरातील विविध कामांसाठी जेसीबी, डंपर आणि ट्रॅक्टर खरेदी केले होते. त्याचे पूजन खा. उदयनराजे यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर या नवीन डंपरमधून शहरात उदयनराजेंनी फेरफटका मारला होता. यावेळी नगराध्यक्ष, नगरसेवकांसह अधिकाऱ्यांची मात्र चांगलीच धावपळ झाली. उदयनराजेंच्या डंपर सफारीची चर्चा मात्र सातारा शहरात आज खुमासदार सुरू होती.

Read More