Marathi News> पश्चिम महाराष्ट्र
Advertisement

उदयनराजे साताऱ्यात डंपर घेऊन फिरतात तेव्हा...

नगरसेवकांसह अधिकाऱ्यांची मात्र चांगलीच धावपळ उडाली.

उदयनराजे साताऱ्यात डंपर घेऊन फिरतात तेव्हा...

सातारा: राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांचा रांगडा आणि बेधडक स्वभाव सर्वश्रूत आहे. सातारकरांना शनिवारी पुन्हा एकदा त्यांच्या या स्वभावाची प्रचिती आली. सातारा नगरपरिषदेने शहरातील विविध कामांसाठी जेसीबी, डंपर आणि ट्रॅक्टर खरेदी केले होते. त्याचे पूजन खा. उदयनराजे यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर या नवीन डंपरमधून शहरात फेरफटका मारला. 

यावेळी नगराध्यक्ष, नगरसेवकांसह अधिकाऱ्यांची मात्र चांगलीच धावपळ झाली. उदयनराजेंच्या डंपर सफारीची चर्चा मात्र सातारा शहरात आज खुमासदार सुरू होती.

यापूर्वी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही एका कार्यक्रमात उदयनराजेंच्या स्टाईलची नक्कल केली होती. त्यावेळी शरद पवारांनी शर्टची कॉलर वर करुन दाखवल्यामुळे उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला होता.

Read More