Marathi News> पश्चिम महाराष्ट्र
Advertisement

लग्नाचे वऱ्हाड घेवून जाणाऱ्या वाहनाला भीषण अपघात; दोन ठार तर 25 जण जखमी

40 व्हराडी पिकअप व्हॅनमधून सोलापूरकडे लग्नाला जात होते. यावेळी हे वाहन अपघातग्रस्त झाले. 

लग्नाचे वऱ्हाड घेवून जाणाऱ्या वाहनाला भीषण अपघात; दोन ठार तर 25 जण जखमी

Solapur Accident : लग्नाचे वऱ्हाड घेवून जाणाऱ्या वाहनाला भीषण अपघात झाल आहे. या अपघातात दोघे जण जागीच ठार झाले आहेत. तर, 25 जण जखमी झाले आहेत.  अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी नाक्याजवळ पिकअप व्हॅनला हा अपघात झाला आहे. या अपघातमुळे लग्न सोहळ्याच्या आनंदावर दुख:ची सावली पसरली आहे.   

अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गीजवळ वऱ्हाडाच्या गाडीला भीषण अपघात झाला आहे. मंगळवारी सकाळच्या दरम्यान हा अपघात घडला आहे.  असून मैंदर्गी नाक्या जवळच्या वळणावर नादानुर तालुका अफजलपुर जिल्हा - गुलबर्गा येथे पिकअप वाहन अपघातग्रस्त झाले.  40 व्हराडी पिकअप व्हॅनमधून सोलापूरकडे लग्नाला जात असताना मैंदर्गी जवळील वळणावर पिकअप व्हॅन पलटी होऊन दोन जणांचा जागीच मृत्यू झाला.

तर, यामध्ये 25 जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये महिला आणि बालकांचा समावेश आहे. जखमींवर अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. याच अपघातातील आणखी दहा जणांना श्री छत्रपती शिवाजी महाराज शासकीय सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.

मध्य प्रदेशात बस नदीत कोसळली

मध्य प्रदेशच्या खरगोनमध्ये बसचा भीषण अपघात झाला आहे. प्रवाशांनी भरलेली बस पुलावरून नदीत कोसळली. या दुर्घटनेत 15 जणांचा जागीच मृत्यू झालाय तर 25 प्रवासी जखमी झाले आहेत. बसमध्ये 50 प्रवासी असल्याचे समजते.घटनास्थळी रेस्क्यू टीम दाखल झाली यांनतर प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. 

वर्ध्यात ब्रेक फेल झालेली बस चढली रस्ता दुभाजकावर

आर्वीहून वर्ध्याकडे येत असलेल्या बसचे ब्रेक फेल झाले. चालकाने नियंत्रण मिळवत ही बस रस्ता दुभाजकावर चढली. यावेळी चालकाच्या प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला. वर्ध्याच्या कारला चौक परिसरात ही घटना घडली. दुभाजकावर चढून खांबाला धडकून बस थांबली. अपघातात कुणीही जखमी न झाल्याने सर्वांनी मोकळा श्वास घेतला.

Read More