Marathi News> पश्चिम महाराष्ट्र
Advertisement

नगर अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेतील 150 कोटींच्या घोटाळाप्रकरणी अखेर गुन्हा दाखल

अहमदनगर येथील नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेची घोटाळ्याची मालिका संपता संपत नाहीये. आता बँकेत सुमारे दीडशे कोटींच्या अपहार आणि घोटाळा झाल्याच समोर आलं आहे. 

नगर अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेतील 150 कोटींच्या घोटाळाप्रकरणी अखेर गुन्हा दाखल

लैलेश बारगजे, अहमदनगर : अहमदनगर येथील नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेची घोटाळ्याची मालिका संपता संपत नाहीये. आता बँकेत सुमारे दीडशे कोटींच्या अपहार आणि घोटाळा झाल्याच समोर आलं आहे. 

तब्बल दीडशे कोटींच्या घोटाळ्यानंतर तत्कालीन संचालक आणि अधिकाऱ्यांच्या विरोधात कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. बँकेचे जुने सभासद राजेंद्र गांधी यांनी 2015 ते 2021 पर्यंतच्या 28 प्रकरणाचा दाखला देत जवळपास 150 कोटी रुपयांच्या घोटाळ्या बाबत कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.

 संचालक मंडळ, बँक कर्मचारी यांनी संगनमताने घोटाळे केल्याचं आरोप तक्रारी मध्ये केला आहे. यापूर्वीही बँकेच्या घोटाळ्याचे वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मात्र, आता या प्रकरणात फिर्यादी असलेल्या राजेंद्र गांधी यांनी 28 प्रकरणांची एकत्रित फिर्याद दिली आहे. गांधी यांनी 2019 मध्येही पोलिसांकडे तक्रार केली होती... अखेर न्यायालयाच्या आदेशाने या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

Read More