Ajit Pawar on Hinjwadi IT Park: हिंजवडी पाहणी दौ-यात पालकमंत्री अजित पवार आक्रमक झाल्याचं पाहायला मिळाले. यावेळी अजित पवारांनी आयटी पार्क बंगळुरु, हैदराबादला जात असल्याची कबुली दिली. दादांनी दिलेल्या कबुलीनंतर विरोधकांनी थेट भाजपवर निशाणा साधलाय. पाहुयात यासंदर्भातला आमचा हा स्पेशल रिपोर्ट.
महाराष्ट्रातील उद्योगावरून अजित पवारांनी एक मोठं विधान केलंय. हिंजवडी पाहणी दौ-यात पालकमंत्री अजित पवार चांगलेच आक्रमक झाले होते. दरम्यान यावेळी अजित पवारांनी महाराष्ट्रातील उद्योग राज्याबाहेर जात असल्याची थेट कबुलीच दिली. महाराष्ट्रातील उद्योग - धंद्यावरून मविआ आणि महायुतीमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी रंगल्या होत्या. महाराष्ट्रातील उद्योग राज्याबाहेर जात असल्याचा आरोपही करण्यात आला होता.. दरम्यान विरोधकांचे सर्व आरोप सत्ताधा-यांनी फेटाळले होते. मात्र, आता थेट अर्थमंत्र्यांनीच उद्योग महाराष्ट्राबाहेर
जात असल्याची कबुली दिल्यानं चांगलीच चर्चा रंगली आहे.
अजित पवारांनी दिलेल्या कबुलीनंतर विरोधकांना सरकारवर टीका करण्याची आयती संधीच मिळाली.. अजित पवार सत्य बोलले आहेत. राज्यातून उद्योग बाहेर चालले हे माहिती असूनही सरकारनं कोणताही निर्णय घेतला नसल्याची टीका राष्ट्रवादी एसपीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत
शिंदेंनी केली आहे.
अजित पवार सत्य बोलले, हिंजवडीमधील उद्योग बाहेर जातायत असं शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी म्हटलं आहे. रोहित पवारांनी देखील आयटी पार्कच्या मुद्द्यावरून भाजपवर निशाणा साधला आहे. भाजपला अजित पवारांची कोंडी करायची आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तसंच पुण्यातील आयटी पार्क देशात नंबर एक होतं ते आता सहाव्या नंबरवर आल्याची खंत देखील त्यांनी व्यक्त केली आहे. भाजपला अजित पवारांची कोंडी करायची आहे का? अशी विचारणाही रोहित पवारांनी केली आहे.
महाराष्ट्रातील उद्योगावरून मविआ आणि महायुतीमध्ये चांगलंच रान पेटलं होतं. तेव्हा विरोधकांनी केलेल्या आरोप फेटाळत सत्ताधा-यांनी विरोधकांनाच कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, आता अजितदादांनीच उद्योग महाराष्ट्राबाहेर जात असल्याची कबुली दिली
आहे. त्यामुळे दादांच्या या वक्तव्यानंतर महायुती चांगलीच अडचणीत येण्याची शक्यता आहे.