History Of Baramati : बारातमती म्हंटल की डोळ्यासमोर येतात शरद पवार आणि अजित पवार... महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतात सर्वात जास्त चर्चेत तालुका म्हणजे बारामती. पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्याचा इतिहास फारच रंजक आहे. भेट मिळून मिळालेल्या प्रांताचे थेट ओरंगजेबच्या मृत्यूशी कनेक्शन आहे. बारामती हे नाव कसे पडले यामागची स्टोरी देखील खूपच इंटरेस्टिंग आहे. जाणून घेऊया सर्व काही.
बारामती हा पुणे जिल्ह्यातील छोटासा तालुका राजकीयदृष्ट्या खूपच महत्वाचा आहे. मात्र, बारामतीची ओळख फक्त राजकारणापुरती मर्यादित नाही. शेती तसेच औद्योगिक क्षेत्रात बारामतीने खूप प्रगती केली आहे. यामुळेच बारामती तालुका आर्थिकदृष्ट्या देखील मजबूत बनला आहे. बारामती मध्ये एकूण 116 गावांचा समावेश होतो. बारामती तालुक्याचा इतिहास हा 700 वर्ष जुना आहे.
बारामती हे तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. बारामतीचे पूर्वीचे नाव 'भीमथडी' असे होते. बारामती हे एक एैतिहासिक पार्श्वभूमी असलेले गाव कऱ्हा नदीच्या तिरी वसलेले आहे. गावातून वाहणाऱ्या कऱ्हा नदीच्या तीरावर दोन खूप प्राचीन मंदिरे बांधलेली असून ही दोनीही मंदिरे जवळपास ईसविसन 750 च्या दशकामधील आहेत. त्यापैकी एक मंदिर श्री काशीविश्वेश्वरांचे असून ते कऱ्हा नदीच्या पश्चिमेस आहे तर दुसरे मंदिर हे श्री सिद्धेश्वराचे असून ते कऱ्हा नदीच्या पूर्वेकडे आहे. मंदिरा समोरच प्रचंड मोठी अशी नंदीची मूर्ती असून तो एक स्थापत्यकलेचा उत्तम नमुनाच म्हणावा लागेल. श्रीधरस्वामी यांच्या शिवलीलामृत या महाकाव्या मध्ये या दोन्ही मंदिरांचे संदर्भ सापडतात.
एकेकाळी बारामतीवर देवगिरीचे यादव राज्य करत होते. परंतु , यादवशाहीचा ऱ्हास झाल्यानंतर गुलबर्ग्याच्या बहामांचे राज्य होते. ईसविसन 1603 मध्ये अहमदनगरच्या निजामशहाने हे राज्य श्रीमंत मालोजीराजे भोसले यांना भेट दिले . यानंतर महापराक्रमी छत्रपती शिवाजी महाराजांचे बारामतीवर राज्य होते. त्याकाळी दादोजी कोंडदेव हे बारामतीचे प्रशासक होते. मराठेशाहीच्या ऱ्हासानंतर दिल्लीच्या मुघलांनी बारामती वर राज्य केले.
औरंगजेबच्या मृत्यूनंतर ईसविसन 1745 मध्ये बारामती राज्य पुन्हा मराठ्यांनी जिंकून घेतले. प्रशासक म्हणून श्रीमंत बाबुजी नाईकांची नेमणूक केली. उत्तम प्रशासक तसेच कलेचे आणि धर्माचे उपासक होते. बाबुजी नाईक यांनीच कविवर्य मोरोपंत यांना उदात्तपणे अनुमोदित केले. बारामती हे सध्या महाराष्ट्राचे सर्वात मोठे नेते शरद पवार यांचे मुळगाव म्हणून ओळखले जाते. त्यांच्या नेतृत्वामुळे आणि दूरदृष्टी मुळेच बारामतीची चोफेर प्रगती झालेली आपणास पहालया मिळते आहे.