Central Railway Ganpati Special Train Reservation Updates: वर्षभर रिकामी असणारी कोकणातील गावं सणावारांना बहरून जातात. त्याच सणवारांपैकी एक म्हणजे गणेशोत्सव. यंदा ऑगस्टच्या अखेरीसच बाप्पा घरोघरी विराजमान होणार असल्यानं आता या बहुप्रतिक्षित आणि हव्याहव्याशा पाहुण्याच्या स्वागतासाठी सर्वतोपरि तयारी सुरू आहे. इथं मुंबईतून गाव गाठण्यासाठी चाकरमानी उत्सुक असले तरीही त्यांच्या वाटेत दरवर्षी येणाऱ्या अडचणी मात्र काही केल्या कमी होण्याचं नाव घेत नाही आहेत. कारण, जादा गाड्यांची सुविधा देऊनही काही सेकंदांतच या रेल्वेगाड्यांची तिकीटविक्री काही सेकंदांतच फुल झाली आहे.
काही दिवसांपूर्वीच रेल्वे प्रशासनाच्या वतीनं गणेशोत्सवाच्या निमित्तानं गणपती विशेष ट्रेन सोडण्याची बाब जाहीर करण्यात आली. मात्र या गाड्यांचं तिकीट आरक्षण सुरू होताच काही सेकंदांमध्ये तिकीटविक्री पूर्णही झाली. जादा गाड्यांचंही तिकीट मिळू शकल्यानं अनेक चाकरमान्यांनी निराशा व्यक्त करत आता काय ती देवाक् काळजी! असाच सूर आळवला.
मध्य रेल्वेच्या छशिमट अर्थात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) आणि लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) इथून सुटणाऱ्या चार विशेष रेल्वेगड्यांचं तिकीट स्टेटस मिनिटभरात 'रिग्रेट' असं दिसू लागलं यावरूनच किती झपाट्यानं रेल्वेची तिकीचं बुक झाली याचा अंदाज लावता येत आहे.
सीएसएमटी–सावंतवाडी–सीएसएमटी विशेष गाडी (01103/01104) - ही रेल्वे दर दिवशी सुद्धा दररोज धावणार असून गाडी क्रमांक 01103 CSMT वरून दुपारी 3:30 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री 4:00 वाजता सावंतवाडीला पोहोचेल. गाडी क्रमांक 01104 दररोज पहाटे 4:35 वाजता सावंतवाडी इथून सुटेल आणि दुपारी 4:40 वाजता CSMT ला पोहोचेल.
सीएसएमटी–सावंतवाडी रोड विशेष गाडी (01151/01152) - ही ट्रेन रोज सुरू राहणार असून अनुक्रमे पहिली गाडी CSMT वरून रात्री 12:20 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 2:20 वाजता सावंतवाडी गाठेल, तर परतीची गाडी क्रमांक सावंतवाडीहून पहाटे 3:35 वाजता सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे 4:35 वाजता CSMT ला पोहोचेल.
दिवा–चिपळूण–दिवा मेमू अनारक्षित विशेष गाडी (01155/01156) - ही ट्रेन प्रवाशांच्या सेवेत रोज असेल गाडी क्रमांक 01155 दिव्याहून सकाळी 7:15 वाजता कोकण रोखाने प्रवास सुरू करून दुपारी 2:00 वाजता चिपळूणला पोहोचेल. तर गाडी क्रमांक 01156 चिपळूणहून दुपारी 3:30 वाजता सुटणार असून रात्री 10:50 वाजता दिवा गाठेल.
पुणे–रत्नागिरी साप्ताहिक विशेष गाडी (01447/01448)- ही ट्रेन ऑगस्ट मगिन्याच्या 23, 30 तारखांसह सप्टेंबर महिन्याच्या 6 तारखेला धावेल. यापैकी गाडी क्रमांक 01447 पुण्याहून रात्री 12:25 वाजता सुटेल आणि सकाळी 11:50 वाजता रत्नागिरीला पोहोचेल. तर, दुसरीकडे गाडी क्रमांक 01448 रत्नागिरीहून सकाळी 5:50 वाजता पुणे रोखानं प्रवास सुरू करून दुसऱ्या दिवशी सकाळी 5:00 वाजता पुणे स्थानकात पोहोचेल.
याव्यकिरिक्त प्रवाशांच्या सेवेत सीएसएमटी–रत्नागिरी विशेष गाडी (01153/01154), एलटीटी–सावंतवाडी रोड दैनिक विशेष गाड्या (01167/01168 आणि 01171/01172), एलटीटी–सावंतवाडी साप्ताहिक विशेष गाडी (01129/01130), एलटीटी–मडगाव साप्ताहिक विशेष गाडी (01185/01186) , एलटीटी–मडगाव एसी साप्ताहिक विशेष गाडी (01165/01166) आणि पुणे–रत्नागिरी एसी विशेष गाडी (01445/01446) अशा रेल्वे प्रवाशांच्या सेवेत असतील.