Marathi News> पश्चिम महाराष्ट्र
Advertisement

Budget Session 2022 : अधिवेशन चालू द्यायचे असेल तर... काय म्हणाले चंद्रकांत पाटील

राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३ मार्चपासून सुरु होतंय. त्या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अधिवेशनाबाबत मोठं वक्तव्य केलंय.

Budget Session 2022 : अधिवेशन चालू द्यायचे असेल तर... काय म्हणाले चंद्रकांत पाटील

पुणे : एडीने राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांना 23 फेब्रुवारीला अटक केली. मलिक यांना अटक केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार त्यांचा राजीनामा घेतील असं वाटलं होतं. पण त्यांनी तसं केलं नाही. मलिक दाऊदशी जोडले आहेतच. पण. त्यांना पाठीशी घालणारे सरकारही दाऊदशी जोडले गेलेत, असा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलाय. 

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटानंतर घेतलेली भूमिका आणि आत्ता त्यांचे चिरंजीव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेली भूमिका खूपच वेगळी आहे. दाऊद आणि नवाब मलिक यांचे संबंध असणारी लिंक आत्ता ओपन झाली, म्हणून त्यांच्यावर आता कारवाई होत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. 

महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांची दररोज एक एक नावं समोर येत आहेत. फोन टॅपिंग प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांची चौकशी करायला सरकारला कुणी अडवलं नाही. सरकार स्थापन होऊन 27 महिने झाले. मग, इतके महिने का कारवाई केली नाही. ते जर दोषी असतील तर कारवाई करायला कुणी अडवलं नाही.

संजय राऊत याची आरोप करण्याची पातळी खुपच खालच्या स्तरावर गेलीय. अधिवेशनापूर्वी आघाडी सरकारने नवाब मलिक यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घेतला नाही तर आम्ही अधिवेशन चालू देणार नाही असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

Read More