Marathi News> पश्चिम महाराष्ट्र
Advertisement

Kolhapur | आरोग्य यंत्रणेची लक्तरं वेशीवर; अर्भकाचा आरोग्य केंद्राबाहेर वाहनातच मृत्यू

Kolhapur news upsate : कोल्हापूर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेची लक्तरं वेशीवर टांगणारी घटना समोर आली आहे. कोल्हापूरातील पुलाशी शिरोली येथे गर्भवती महिलेची प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दारातच वाहनात प्रसूती झाली . प्रसूती दरम्यान, अर्भकाचा मृत्यू झाला आहे

Kolhapur | आरोग्य यंत्रणेची लक्तरं वेशीवर; अर्भकाचा आरोग्य केंद्राबाहेर वाहनातच मृत्यू

प्रताप नाईक, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेची लक्तरं वेशीवर टांगणारी घटना समोर आली आहे. कोल्हापूरातील पुलाशी शिरोली येथे गर्भवती महिलेची प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दारातच वाहनात प्रसूती झाली आहे. प्रसूती दरम्यान, अर्भकाचा मृत्यू झाला आहे. 

कोल्हापूरात यंत्रणेच्या तसेच डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे संताप आणणारी घटना घडली. पुलाशी शिरोली येथील एका महिलेला प्रसूती वेदना जाणवू लागल्याने जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. 

परंतू डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे  आरोग्य केंद्राच्या दारात असतानांच वाहनात महिलेची प्रसूती झाली. परंतू अर्भकाचा मृत्यू झाला. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे अर्भकाचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांनी आरोप केला आहे.

या घटनेस  जबाबदार असलेल्या संबंधितांवर कारवाईसाठी नातेवाइकांनी प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर ठिय्या आंदोलन केले.

अर्भकाचा मृतदेह ताब्यात घ्यायला नकार

महिलेच्या नातेवाईकांनी जोपर्यंत दोषींवर कारवाई होत नाही, तोपर्यंत अर्भकाचा मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे म्हटले. घटनेची चौकशी केल्यानंतर दोषींवर कारवाई करण्याच्या जिल्हा प्रशासनाच्या आश्वासनानंतर नातेवाईकांनी आंदोलन थांबवले.

Read More