Marathi News> पश्चिम महाराष्ट्र
Advertisement
LIVE NOW

Maharashtra Lok Sabha Nivadnuk Voting LIVE:मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शुक्रवारी पुण्यात जाहीर सभा

Maharashtra Lok Sabha Election Phase 3 Voting LIVE: राज्यात आणि देशात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. यामध्ये अनेक तुल्यबळ लढती पाहायला मिळतील.   

Maharashtra Lok Sabha Nivadnuk Voting LIVE:मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शुक्रवारी पुण्यात जाहीर सभा
LIVE Blog

Maharashtra Lok Sabha Election Phase 3 Voting LIVE: लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या आणि निर्णायक टप्प्यासाठी आज मतदान होणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 11, तर देशातील 12 राज्यातील 94 मतदारसंघांमध्ये ही निवडणूक होतेय. महाराष्ट्रातील ज्या 11 मतदारसंघात मतदान होणाराय, त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रासह, रायगड, रत्नागिरी-सिंधुदुर्गचा समावेश आहे. याठिकाणी पवार, नारायण राणे, उदयनराजे भोसले, छत्रपती शाहू महाराज, राजू शेट्टी अशा अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. 

07 May 2024
07 May 2024 21:43 PM

पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा सारसबाग परिसरात येत्या शुक्रवारी (ता. 10 मे) सायंकाळी 6 वाजता आयोजित करण्यात आली आहे.

07 May 2024 21:40 PM

20 वर्षात खैरेंनी एकही काम केलं नाही आणि आता म्हणतायत इतकी 5 वर्ष मला द्या. म्हणजे वीस वर्षात एकही काम केलं नाही आणि अजून पाच वर्ष वाट लावायची-संदिपान भुमरे

07 May 2024 21:20 PM

बीड जिल्ह्याच्या विकासासाठीच मी प्रयत्न करत आहे. या विकासाची, बीड जिल्ह्यातील जाती जातीच्या सुलोख्याची तस्करी होऊ देऊ नका-  पंकजा मुंडे यांनी जनतेला घातली साद 

07 May 2024 21:05 PM

मतदानाची टक्केवारी कमी जरी वाटत असली तरी आमच्या कार्यकर्त्यांनी मतदान करून घेतले आहे. आमची लोक आम्हाला मतदान करत आहेl. घाबरण्याची गरज नाही- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

07 May 2024 20:39 PM

4 जूनला महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर पाच जूनला मीध्यांना उलट लटकवून असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. धुळ्यामध्ये काँग्रेस उमेदवार शोभा बच्छाव यांच्या प्रचार सभेत निमित्ताने उद्धव ठाकरे धुळ्यात आले होते. यावेळेस त्यांनी प्रचार सभेमध्ये एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता त्यांना इशारा दिला आहे. चार जून रोजी महाविकास आघाडीचे सरकार केंद्रात सत्तारूढ होईल आणि त्यानंतर पाच जूनला मिंध्यांना उलट टांगु असा इशारा त्यांनी दिला आहे.

07 May 2024 19:16 PM

मतदान प्रक्रिया पूर्ण होताच सोलापुरात काँग्रेसचा जल्लोष. निकालापूर्वीच काँग्रेसला विजयाचा आत्मविश्वास. मतदान प्रक्रिया पूर्ण होताच सोलापुरात काँग्रेस शहराध्यक्षांसह कार्यकर्त्यांचा जल्लोष. रामलाल चौक ते भैय्या चौकापर्यंत घोषणाबाजी करत पदयात्रा. राम सातपुते आणि भाजपाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी. घटनेची माहिती मिळताच स्वतः पोलीस आयुक्त एम. राजकुमार घटनास्थळी दाखल.

07 May 2024 19:05 PM

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी ईव्हीएमची पूजा केल्याने त्यांच्या डोक्यात फरक पडल्याची बोचरी टीका काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे यांनी केली आहे. महिला आयोगाच्या अध्यक्ष असतानाही शासकीय कार्यालयातून निवडणूक प्रचार आणि आता ईव्हीएम ची पूजा त्यांनी केल्याने त्यांना आयोगाच्या कार्यालयात बसू देणार नाही असाही ईशारा सव्वालाखे यांनी दिला आहे. रूपाली चाकणकर ह्या नॉर्मल नसून त्यांची तात्काळ वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये रवानगी करा अशीही मागणी संध्या सव्वालाखे यांनी केली.

07 May 2024 18:07 PM

मतदान करायला गेले अन् यादीतून नावच गायब; अनेकजण मतदानापासून वंचित राहणार, लातूरमधील प्रकार

07 May 2024 17:34 PM

धाराशिव मध्ये मतदानाचा टक्का घसरला; दिवसभरात शांततेत पार पडल मतदान

07 May 2024 17:31 PM

राज्यात संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 53.40 टक्के मतदान, कोणत्या जिल्ह्यात किती मतदान याचा आढावा

लातूर - 55.38

सांगली - 52.56

बारामती - 45.68

हातकणंगले - 62.18

कोल्हापूर - 63.71

माढा - 50

धाराशिव - 52.78

रायगड - 50.31

रत्नागिरी-सिंधुदूर्ग - 53.75

सातारा - 54.11

सोलापूर - 49.17

07 May 2024 17:31 PM

सातारा लोकसभा मतदारसंघ सायंकाळी 5 पर्यंत 54.1 % मतदान

07 May 2024 16:10 PM

लातूर लोकसभा मतदारसंघात दुपारी 3 वाजेपर्यंत 44.48 टक्के 

अहमदपूर...45.22 टक्के 
लातूर शहर..43.45 टक्के 
लातूर ग्रामीण..46.10 टक्के 
लोहा.......      42.10 टक्के 
निलंगा.....      44.50 टक्के 
उदगीर........   45.45 टक्के

07 May 2024 15:47 PM

बोगस मतदानावरून वाद तापला; पद्माराजे केंद्रावर शिवसेनेने मतदान रोखले

 

07 May 2024 15:36 PM

रायगड लोकसभा मतदार संघ; दुपारी 3 वाजेपर्यंत 41.43 टक्के मतदान

07 May 2024 15:33 PM

सोलापूर मतदारसंघातील दोन गावांचा मतदानावर बहिष्कार

 मोहोळ तालुक्यातील मनगोळी आणि भैरववाडी ग्रामस्थांनी गावाला येण्यासाठी रस्ते नसल्यामुळे ग्रामस्थांनी टाकला बहिष्कार मतदानावर बहिष्कार

07 May 2024 15:33 PM

- सातारा लोकसभा मतदारसंघ दुपारी 3 पर्यंत 43.08 % मतदान

- सोलापूर लोकसभा मतदारसंघात एकूण 40.18% मतदान

- सांगली -  लोकसभा मतदारसंघासाठी  दुपारी 3 वाजेपर्यंत सुमारे 41.30 टक्के इतकया मतदानाची नोंद.

07 May 2024 14:58 PM

सोलापुरात सातपुते - काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची 

सोलापूरमध्ये भाजप उमेदवार राम सातपुते आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. सोलापुरातील सिद्धेश्वर पेठ भागामध्ये मतदान केंद्रावर राम सातपुते यांनी मतदान केंद्राला भेट दिली होती. त्यावेळी काही लोक बोगस मतदान करण्याच्या प्रयत्नात असल्याचा संशय असल्याने सातपुते यांनी काही लोकांना बाहेर काढण्याची विनंती पोलिसांना केली. यातून काँग्रेस कार्यकर्त्यांनी वाद घातल्याचा सातपुते यांनी आरोप केला. तर भाजप उमेदवार राम सातपुते मतदान केंद्रासमोर येऊन मतदारांना प्रभावित करत होते, असा आरोप काँग्रेस कार्यकर्त्यांनी केलाय. तसंच सातपुते अरेरावेची भाषा केल्याने वाद झाल्याचा काँग्रेस कार्यकर्त्यांचा दावा आहे. 

 

07 May 2024 14:38 PM

राजेंद्र पवार आणि श्रीनिवास पवारांनी बजावला मतदानाचा हक्क

आमदार रोहित पवारांचे वडील राजेंद्र पवार यांनी मतदान केलं. बारामतीतल्या पिंपळी इथल्या मतदान केंद्रावर त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.  दरम्यान श्रीनिवास पवार यांनी बारामतीत मतदानाचा हक्क बजावला. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देत त्यांनी अजित पवारांना जोरदार टोला लगावला...पैसे वाटप प्रकरणावर त्यांनी नाराजी व्यक्त केली. शरद पवारांनी साठ वर्षात असं कधी केलं नाही असं श्रीनिवास पवारांनी म्हटलंय

07 May 2024 14:35 PM

नात्यात विभक्तपणा येऊ नये हेच आमचं मत - शिरसाट

सुप्रिया सुळेंनी अजित पवारांच्या घरी का जाऊ नये... नात्यात विभक्तपणा येऊ नये हेच आमचं मत आहे.. सुप्रिया सुळेंनी आशाताईंच्या घेतलेल्या भेटीवर शिवसेनेने ही पहिली प्रतिक्रिया दिलीय.. आज हे गेले तर उद्या ते जातील असं विधान शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी केलंय...

 

07 May 2024 14:34 PM

माढा लोकसभा मतदारसंघात रक्तरंजित राडा 

माढा लोकसभा मतदारसंघात रक्तरंजित राडा पाहायला मिळालाय... सांगोला तालुक्यातल्या महूदमध्ये दोन गटात जोरदार राडा झाला. कार्यकर्त्याचं डोकं फोडण्यात आलं...  विरोधी गटाकडून मारहाण झाल्याचा आरोप शेकाप कार्यकर्त्यांनी केलाय....

 

07 May 2024 14:03 PM

बंगालमध्ये मतदारांचा उत्साह, महाराष्ट्रात वेग मंदावला

लोकसभा निवडणुकीसाठी आज तिसऱ्या टप्प्यातील मतदान होत असून 11 राज्यांमध्ये 93 जागांवर मतदान सुरु आहे. आज भाजपच्या अनेक दिग्गजांच्या जागांवर मतदान होतंय. शिवराजसिंह चौहान, ज्योतिरादित्य सिंधिया, मनसुख मांडवीय आणि नारायण राणे यांचं भवितव्य ईव्हीएममध्ये अडतंय, तर विरोधी पक्षातील दिग्विजय सिंह, डिंपल यादव, सुप्रिया सुळे यांची विश्वासार्हता पणाला लागलीय.

 

07 May 2024 13:49 PM

महाराष्ट्रात दुपारी 1 वाजेपर्यंत 31.55 टक्के मतदान

राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील अकरा मतदार संघात दुपारी 1 वाजेपर्यंत सरासरी 31.55  टक्के मतदान झाल्याची नोंद झाली आहे. कोल्हापुरात सर्वाधिक तर माढामध्ये सर्वात कमी मतदान झालंय. 
राज्यात एकूण टक्के 31.55 टक्के मतदान
लातूर – 32.71 टक्के  
सांगली – 29.65 टक्के
बारामती – 27.55 टक्के
हातकणंगले – 36.17 टक्के
कोल्हापूर – 38.42 टक्के
माढा – 26.61 टक्के
धाराशिव – 30.54 टक्के
रायगड – 31.34 टक्के
रत्नागिरी-सिंधुदुर्ग – 33.19 टक्के
सातारा – 32.78 टक्के
सोलापूर – 29.32 टक्के

 

07 May 2024 13:23 PM

सुप्रिया सुळेंची ही भावनिक खेळी - फडणवीस

सुप्रिया सुळेंनी अजित पवारांची आई आशाकाकींची भेट घेतल्यावरून फडणवीसांनी प्रतिक्रिया दिलीय...सुप्रिया सुळेंची ही भावनिक खेळी असल्याचं फडणवीसांनी म्हणलंय...सुळे-अजित पवार हे शत्रू नाहीत ते भाऊ-बहीण आहेत...त्यामुळे त्यांची भेट कशासाठी होती हे कळेलच अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी दिलीय... 

 

07 May 2024 13:12 PM

धैर्यशील माने, सत्यजित पाटील यांचे कार्यकर्ते भिडले

हातकणंगलेमधून मोठी बातमी समोर येतेय.... महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने आणि सत्यजीत पाटील यांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले... वाळवा तालुक्यातल्या साखराळे गावातल्या मतदान केंद्रावर हा राडा झालाय.. मतदान केंद्र क्रमांकं 62 आणि 63 वरच्या सत्यजीत पाटील यांच्या बोगस प्रतिनिधींवर कारवाई करण्याची मागणी धैर्यशील माने यांच्या कार्यकर्त्यांनी केली होती.. या तक्रारीनंतर मतदान केंद्र काही काळासाठी बंद ठेवण्यात आलं होतं. यावरुन सत्यजित पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत जाब विचारण्यासाठी आले.. तेव्हा दोन्ही गटामध्ये शाब्दिक बाचाबाची झाली, ज्याचं रुपांतर हाणामारीत झालं... 

 

07 May 2024 13:09 PM

निवडणूक ड्युटीवर असताना 2 सरकारी कर्मचाऱ्यांचा मृत्यू

कर्नाटकात निवडणूक ड्युटीवर तैनात असलेल्या दोन सरकारी कर्मचाऱ्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. यातील एक कर्मचारी शिक्षण विभागात, तर दुसरा कर्मचारी कृषी विभागात सहायक कृषी अधिकारी म्हणून कार्यरत होता.

 

07 May 2024 13:01 PM

असंविधानिक भाषा भरणेंनी वापरली - रोहित पवार

रोहित पवार यांनी भरणे यांच्यावर टिका केली. असंविधानिक भाषा ही भरणेंनी वापरली असं त्यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं. तर आत्या सुप्रिया सुळे यांनी संस्कृती जपली, अस म्हणत अजित पवारांच्या घरी जाऊन मोठ्यांचा आशीर्वाद घेतला असं ते म्हणाले. 

07 May 2024 12:44 PM

Lok Sabha Election 2024: Narayan Rane | मतदान केल्यानंतर नारायण राणेंनी केला हा विश्वास व्यक्त

07 May 2024 12:29 PM

ईव्हीएमवर कमळाचं चिन्ह दिसत नसल्याने आजोबा संतापले

पुण्याच्या धायरीच्या काका चव्हाण शाळेतल्या मतदान केंद्रावर मतदानाला गेलेले आजोबा चांगलेच संतापल्याचं दिसून आलं. बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये यावेळी घड्याळ चिन्हावर महायुतीचा उमेदवार आहे. मात्र कमळ चिन्ह मतदान यंत्रावर दिसत नव्हतं. त्यामुळे भाजपच्या पारंपरिक मतदारांचा मात्र संताप पाहायला मिळालाय. यावेळी एक आजोबांनी संताप व्यक्त केला.

07 May 2024 12:12 PM

देशात 11 वाजेपर्यतत २५.४१ टक्के मतदान झालं आहे.

पश्चिम बंगालमद्ये सर्वाधिक मतदान - ३२.८२

महाराष्ट्रात सर्वात कमी मतदान १८.१८ टक्के

07 May 2024 11:59 AM

सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट

खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांच्या आई आशा पवार यांची काटेवाडीतील पवार फार्मवर जाऊन भेट घेतली. आपण दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये काकीकडे जाऊन राहायचो, त्यांनी बनवलेले लाडू खूप आवडतात. त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आले असल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

07 May 2024 11:48 AM

रायगड लोकसभा मतदार संघातील रोहा तालुक्यातील धाटाव येथील मतदान केंद्रावर evm मशीन बंद पडलं आहे. मागील 45 मिनिट पासून मतदान प्रक्रिया खोळंबली आहे. तांत्रिक बिघाड दूर करण्यासाठी यंत्रणा पोहोचली आहे. यावेळी मतदार मात्र ताटकळत असून संभ्रमाचे वातावरण निर्माण झालं आहे.

07 May 2024 11:15 AM

सकाळी 6 ते 10 पर्यंतची मतदानची आकडेवारी आहे 

  • लातूर : 7.91%
  • सांगली : 5.81 %
  • बारामती: 5 .77%
  •  हातकणंगले : 7 .55%
  •  सोलापूर: 5.93%
  •  कोल्हापूर : 8.04%
  •  रायगड : 6.84%
  • रत्नागिरी सिंधुदुर्ग : 8.17%
  • सातारा : 7.00%

बारामती लोकसभा मतदारसंघातील मतदानाचा टक्का

  • बारामती : 7.75%
  • भोर : 5.75%
  • दौंड : 5.50%
  • खडकवासला : 6.00%
  • इंदापूर : 5.00 %
  • पुरंदर : 4.94 %
07 May 2024 11:01 AM

सांगलीच्या पडळकरवाडीत आमदार गोपीचंद पडळकर यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. यावेळी लोकशाही मजबूत करण्यासाठी जनतेने जास्तीत जास्त मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केले.

07 May 2024 10:54 AM

धक्कादायक! महाडमध्ये मतदानकेंद्राबाहेर मतदाराचा मृत्यू! केंद्रापासून 100 मीटरवर...

महाराष्ट्रातील 11 मतदारसंघांमध्ये आज मतदान पार पडत असून त्यामध्ये रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघाचाही समावेश आहे. मात्र या मतदारसंघामध्ये मतदानाला जाताना एका मतदाराचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. प्रकाश चीनकटे असं मृत्यू झालेल्या मतदाराचं नाव आहे. नेमकं घडलं काय वाचा येथे क्लिक करुन...

07 May 2024 10:26 AM

"सुनेत्रा पवारांबद्दल वाईट वाटतं, त्यांची दया येते"

सुप्रिया सुळेच बारामती जिंकणार असा विश्वास व्यक्त करताना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सुनेत्रा पवारांना त्यांच्या पतीकडून बळीचा बकरा बनवण्यात आल्याचा टोला त्यांनी लगावला आहे. राऊत यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्गचे महायुतीचे उमेदवार आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे शिवसेनेकडून चौथ्यांदा पराभूत होतील असं भाकित व्यक्त केलं आहे. येथे क्लिक करुन वाचा सविस्तर वृत्त..

07 May 2024 10:25 AM

बारामती सुप्रिया सुळेच जिंकणार; राऊतांनी व्यक्त केला विश्वास

"बारामतीची लढाई ही महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची आणि अस्मितेची लढाई आहे असं मी अनेकदा म्हणालो आहे. बारामती आम्ही जिंकतोच आहोत. महाविकास आघाडीच्या सुप्रियाताई सुळे जिंकणार हे निश्चित आहे," असं उद्धव ठाकरे गटाचे प्रवक्ते असलेल्या संजय राऊत यांनी म्हटलं आहे. "मी सांगतोय ते लिहून ठेवा, विक्रमी मतांनी सुप्रियाताई जिंकणार आहेत," असा दावा उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला.

07 May 2024 09:49 AM

सकाळी 9 वाजेपर्यंतची मतदानाची आकडेवारी आली समोर

महाराष्ट्रात सकाळी 9 वाजेपर्यंत 6.64 टक्के मतदान झालं. यापैकी सर्वाधिक मतदान हे रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये झालं. इथे 8.17 टक्के मतदान झालं. तर सर्वात कमी म्हणजेच 4.99 टक्के मतदान माढ्यात झालं आहे. मतदानसंघनिहाय टक्केवारी खालीलप्रमाणे - 

लातूर - 7.91
सांगली - 5.81
बारामती - 5.77
हातकणंगले - 7.55
कोल्हापूर - 8.04
माढा - 4.99
धाराशिव - 5.79
रायगड - 6.84
रत्नागिरी - 8.17
सातारा - 7
सोलापूर - 5.92

07 May 2024 09:30 AM

राष्ट्रवादी साताऱ्याचा बालेकिल्ला राखणार की भाजप जिंकणार?

07 May 2024 09:26 AM

'रोहित पवारांना अटक करा, त्यांचा फोन तपासा, हातात पैशाच्या बॅगा..'

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांना मतदानाच्या दिवशीच अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे. येथे क्लिक करुन जाणून घ्या यामागील नेमकं कारण काय आहे आणि कोणी केली आहे ही मागणी.

07 May 2024 08:56 AM

शरद पवारांनी काटेवाडी मतदान केंद्रावर बजावला मतदानाचा हक्क

बारामतीमध्येही आज मतदान पार पडत असून राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवारांनी मतदानाचा हक्क बजावला. यावेळेस त्यांच्या कन्या तसेच महाविकास आघाडीच्या बारामतीमधील उमेदवार सुप्रिया सुळेही त्यांच्याबरोबर होत्या. पवारांनी काटेवाडी मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. यंदा शरद पवारांनी मुंबईऐवजी बारामतीमध्ये मतदान केलं.

07 May 2024 08:52 AM

रोहित पवारांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क

शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी पिंपळी (बारामती) येथे मतदानाचा हक्क बजावला. "पिंपळी (बारामती) इथं आई, बाबा, पत्नी आणि ताई यांच्यासमवेत सहकुटुंब लोकशाहीतील सर्वांत पवित्र मतदानाचा हक्क बजावला," अशी कॅप्शन देत त्यांनी मतदानकेंद्रावरील फोटो शेअर केले आहेत. 

"तुम्हीही मतदान करा आणि गुंडगिरी, दडपशाहीला गाडून लोकशाही बळकट करा," असं आवाहन रोहित पवारांनी केलं आहे.

07 May 2024 08:49 AM

सिंधुदुर्ग : पत्नीने औक्षण केल्यानंतर नारायण राणे मतदानासाठी रवाना

सिधुदुर्गमधील माहयुतीचे उमेदवार नारायण राणेंचं मतदानासाठी घराबाहेर पडले आहेत. पत्नीने औक्षण केल्यानंतर राणे घराबाहेर पडले. त्यांनी मंदिरात जाऊन दर्शनही घेतलं.

07 May 2024 08:43 AM

'बारामतीत पोलीस बंदोबस्तात पैशांचा पाऊस', 'मध्यरात्रीनंतरही बँक सुरु'; कारमध्ये 500 च्या नोटा

बारामती मतदारसंघामध्ये निवडणुकीच्या पूर्वसंध्येला मतदारांना पोलीस संरक्षणामध्ये पैसे वाटप झाल्याचा गंभीर आरोप शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. रोहित पवार यांनी यासंदर्भातील काही फोटो आणि व्हिडीओ त्यांच्या एक्स (आधीचं ट्वीटर) अकाऊंटवरुन पोस्ट केले आहेत. येथे क्लिक करुन पाहा बारामतीमध्ये नेमकं काय घडलं याचे फोटो आणि व्हिडीओ...

07 May 2024 08:28 AM

Maharashtra Lok Sabha Election Phase 3 Voting LIVE: लातूरमध्ये देशमुख कुटुंबीयांकडून मतदान 

लातूरमध्ये रितेश देशमुख, जिनिलिया देशमुख, धीरज देशमुख आणि दीपशिखा देशमुख यांनी बजावला मतदानाचा हक्क. अभिनेता रितेश देशमुख यानं यावेळी मोठ्या संख्येनं मतदान करण्यातं आवाहन केलं. तिथं बारामतीतही पवार कुटुंबातील सदस्यांनी बजावला मतदानाचा हक्क. 

07 May 2024 08:04 AM

Maharashtra Lok Sabha Election Phase 3 Voting LIVE: ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड 

दक्षिण सोलापूर तालुक्यातील गंगेवाडी येथील मतदान केंद्रावर व्हीव्हीपॅट मशीन मध्ये तांत्रिक अडचण निर्माण झाल्याचं म्हटलं जात आहे. व्हीव्हीपॅट बंद असल्या कारणानं गेल्या 15 ते 20 मिनिटांपासून मतदान थांबलं आहे. दोन वेळा मशीन बदलून पाहिल्यानंतरही देखील मशीनमध्ये तांत्रिक अडचण समोर येत असल्याची माहिती आहे. सध्या  मशीन दुरुस्तीसाठी इंजिनीअर्स बुथकडे रवाना झाले असून, गरज वाटल्यास इथं मशीन बदलणार असल्याचं म्हटलं जात आहे. 

07 May 2024 07:34 AM

Maharashtra Lok Sabha Election Phase 3 Voting LIVE: मतदानासाठी आले शाहू महाराज छत्रपती 

कोल्हापुरातून निवडणुकीच्या रिंगणात असणारे आणि संजय मंडलिक यांच्याविरोधात उमेदवारी मिळालेले शाहू महाराज छत्रपती, संभाजीराजे छत्रपती आणि कुटुंबीयांनी बजावला मतदानाचा हक्क. 

07 May 2024 07:34 AM

Maharashtra Lok Sabha Election Phase 3 Voting LIVE: मतदानासाठी आले शाहू महाराज छत्रपती 

कोल्हापुरातून निवडणुकीच्या रिंगणात असणारे आणि संजय मंडलिक यांच्याविरोधात उमेदवारी मिळालेले शाहू महाराज छत्रपती, संभाजीराजे छत्रपती आणि कुटुंबीयांनी बजावला मतदानाचा हक्क. 

07 May 2024 07:33 AM

Maharashtra Lok Sabha Election Phase 3 Voting LIVE: आसामपासून महाराष्ट्रापर्यंत... आज 'या' टॉप 10 उमेदवारांचं भविष्य मतपेटीत होणार कैद; माजी CM चा समावेश

आज 12 राज्यांमध्ये 94 मतदारसंघांसाठी लोकसभेच्या 2024 च्या निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्यात मतदान पार पडत आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 11 मतदारसंघांचाही समावेश आहे. आज पार पडत असलेल्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानामध्ये कोणाकोणचं भविष्य मतपेटीमध्ये कैद होणार आहे पाहा संपूर्ण यादी येथे क्लिक करुन...

07 May 2024 07:29 AM

Maharashtra Lok Sabha Election Phase 3 Voting LIVE: निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात  7 केंद्रीय मंत्री, 5 माजी मुख्यमंत्री मैदानात...

7 केंद्रीय मंत्र्यांमध्ये खालील नावांचा समावेश 

  • अमित शहा, गृहमंत्री
  • मनसुख मांडविया, आरोग्य मंत्री
  • ज्योतिरादित्य सिंधिया, केंद्रीय विमान वाहतूक मंत्री
  • नारायण राणे, केंद्रीय मंत्री
  • एस पी सिंह, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री
  • श्रीपद येसो नाईक, पर्यटन राज्यमंत्री
  • प्रल्हाद जोशी, संसदीय कार्यमंत्री

माजी मुख्यमंत्र्यांची यादी 

  • नारायण राणे, महाराष्ट्र
  • शिवराज सिंह चौहान, मध्यप्रदेश
  • दिग्विजय सिंह, मध्यप्रदेश
  • बसवराज बोम्मई, कर्नाटक
  • जगदीश शेट्टार, कर्नाटक
07 May 2024 07:26 AM

Maharashtra Lok Sabha Election Phase 3 Voting LIVE: मतदानाला सुरुवात 

साताऱ्यात उदयनराजे भोसले, त्यांच्या आई कल्पनाराजे भोसले आणि पत्नी दमयंतीराजे भोसले यांनी बजावला मतदानाचा हक्क

07 May 2024 07:23 AM

Maharashtra Lok Sabha Election Phase 3 Voting LIVE: रोहित पवारांकडून बारामतीत  मतदारांना पैसे वाटल्याचा गंभीर आरोप

बारामतीमध्ये मतदारांना पैसे वाटल्याचा धक्कादायक आरोप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून करण्यात आलाय. इंदापूर आणि बारामतीमध्ये पैसे वाटल्याचा आरोप रोहित पवारांनी विरोधकांवर केलाय. पैशांच्या वाहतुकीसाठी पोलीस यंत्रणेचा वापर केल्याचाही आरोप रोहित पवारांनी केलाय.

07 May 2024 07:19 AM

Maharashtra Lok Sabha Election Phase 3 Voting LIVE: पंतप्रधानांकडून मतदारांना मायबोली मराठीतून आवाहन 

तिसऱ्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी X च्या माध्यमातून एक पोस्ट केली. ज्यामध्ये त्यांनी 'आजच्या टप्प्यात मतदान करणाऱ्या सर्वांनी विक्रमी संख्येने मतदान करावे, असे आवाहन करतो. त्यांच्या सक्रीय सहभागामुळे निवडणूका अधिक चैतन्यमयी होतील.' असं म्हणत मतदारांना साद दिली. 

07 May 2024 07:18 AM

Maharashtra Lok Sabha Election Phase 3 Voting LIVE:  1 हजार 352 उमेदवार मैदानात 

निवडणूक  आयोगाच्या माहितीनुसार निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये 1 हजार 352 उमेदवार मैदानात आहेत. यातील 1229 उमेदवार पुरूष, 123 महिला उमेदवार मैदानात आहेत.

07 May 2024 07:14 AM

Maharashtra Lok Sabha Election Phase 3 Voting LIVE:  माढ्यात मतदानाची सुरुवात

43 माढा लोकसभा मतदार संघासाठी आज मतदान होतंय. 32 उमेदरावकर रिंगणात. 19 लाखांहून अधिक मतदार इथं मतदानाचा हक्क बजावणार आहेत. 18 हजारहून अधिक मतदान अधिकारी इथं नागरिकांच्या सेवेत असणार आहेत. 

Read More