Marathi News> पश्चिम महाराष्ट्र
Advertisement

मी जातो तुम्ही भाषणं करत बसा; अजितदादा आयोजकांवर संतापले

माझ्या आधी काय बोलायचं ते सगळ्यांनी बोला.

मी जातो तुम्ही भाषणं करत बसा; अजितदादा आयोजकांवर संतापले

इंदापूर: सध्या निवडणुकीचे धामधूम असल्यामुळे स्टार प्रचारकांची सभेसाठी धावाधाव होत आहे. त्यातच कार्यकर्त्यांना आपल्या नेत्यांसमोर भाषणाला संधी मिळाली तर तो माईक सोडायला तयार नसतो. असाच प्रकार इंदापूर तालुक्यातील बावडा येथे घडला. अजित पवार यांना बावडा गावची सभा उरकून पुढच्या सभेला निघायचे होते. मात्र सूत्रसंचालक भाषणासाठी वेगवेगळ्या नेत्यांची नावे घेऊन भाषण करण्यास सांगत होता. बराचवेळ हा प्रकार सुरु असल्याचे पाहून अजित पवार भरसभेत उठून माइकच्या दिशेने गेले. यानंतर त्यांनी आपला संताप व्यक्त केला. 

काल मला रात्री दहा वाजता भर पावसात सभा घ्यावी लागली. माझ्या आधी काय बोलायचं ते सगळ्यांनी बोला. नाहीतर असं करा, मी जातो निघून मग तुम्ही भाषणं करत बसा, असे अजितदादांनी सुनावले. 

तत्पूर्वी आपल्या भाषणात अजित पवारांनी हर्षवर्धन पाटील यांच्यावर खोचक टीका केली. हर्षवर्धन पाटील काय स्टाईलबाज राहतात, केसावरून कंगवा फिरवतात. आता मी काय माझ्या डोक्याला केसच राहिले नाहीत. पण तुम्ही असे समजू नका त्यांच्याकडेच कंगवा आहे, कारण मी पण कंगवा वापरतो, असे सांगत त्यांनी खिशातून कंगवा काढून दाखवला. अजितदादांच्या या वक्तव्यानंतर सभेत एकच हशा पिकला. 

Read More