Pune Hinjewadi IT Park History : हिंजवडी पुण्यातील सर्वात मोठा IT पार्क. महाराष्ट्रातील हा सर्वात मोठा IT हब फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. अनेक इंटरनॅशनल कंपन्यांची कार्यालये या हिंजवडी IT पार्क मध्ये आहेत. रातोरात येथे कोट्यावधीची उलाढाल होते. हिंजवडी IT पार्क एक ओसाड माळरान होते. या जागेवर साखर कारखाना उभा राहणार होता. या साखर कारखान्याचे भूमीपूजन देखील झाले होते. मात्र, महाराष्ट्रातील सर्वात पावरफुल नेत्याच्या फक्त एका निर्णयामुळे पुण्यातील हिंजवडी जगप्रसिद्ध IT पार्क उभे राहिले.
हिंजवडीतील राजीव गांधी इन्फोटेक पार्क 2800 एकर जागेवर परसलेले आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अर्थात MIDC ने हे हिंजवडीचे IT पार्क उभारले. हिंजवडीचे IT पार्क मध्ये जवळपास एक हजारच्या आसपास नॅशनल तसेच इंटरनॅशनल IT कंपन्यांची कार्यालये आहेत. 3 लाखांपेक्षा जास्त लोक येथे काम करतात. हिंजवडीचे IT पार्क मध्ये रातोरात कोट्यावधीची उलाढाल होते.
महाराष्ट्रातील सर्वात पावरफुल नेते अशी ओळख असलेले शरद पवार यांच्या पुढाकारामुळेच हिंजवडीचे IT पार्क उभे राहिले. अनेकदा स्वत: शरद पवार यांनी याबाबत सांगितले आहे. याबाबतचा एक किस्सा ने नेहमी आवर्जून सांगतात तो म्हणजे... हिंजवडी आयटी पार्क ऐवजी येथे साखर कारखाना होणार होता. मला खा. नानासाहेब नवले, मदन बाफना यांनी भूमिपूजनासाठी बोलावले. भाषणात मी म्हटले की आज भूमिपूजन जरी केले तरी येथे साखर कारखाना होणार नाही. माझ्या सुरुवातीच्या वाक्यानेच आयोजकांचा चेहरा पडला. त्यांना माझा रागही आला असावा.
हिंजवडीच्या परिसरातील साखर कारखान्याची जागा नानासाहेब नवले यांनी सॉफ्टवेअर पार्कसाठी दिली ती शरद पवारांच्या एका निर्णयामुळे. साखर कारखान्याचे भूमीपूजन झाल्यानंतर शरद पवार यांनी या जागेऐवजी तुम्हाला पर्यायी जागा देतो, तेथे तुम्ही कारखाना सुरु करा, असे नानासाहेब नवले यांनी सुचविले. कारण साखर कारखान्याचे भूमीपूजन होण्याआधी मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या सदस्यांनी पुण्याशेजारी सॉफ्टवेअर उद्योगासाठी जागा उपलब्ध झाली पाहिजे असे शरद पवारांना सुचवले. शरद पवारांनी तात्काळ यावर कार्यवाही करत हिंजवडीच्या परिसरातील साखर कारखान्याची जागा IT पार्कसाछी उलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला आणि नानासाहेब नवले यांच्याशी चर्चा करुन त्यांना पर्यायी जागा उलपब्ध करुन देण्याचे आश्वासन दिले. mनानासाहेब नवले यांनीही शरद पवारांची विनंती मान्य करत त्यांच्या कारखान्याची जागा IT पार्कसाठी दिली. शरद पवारांच्या एका निर्णयामुळे हिंजवडीचे IT पार्क उभे राहिले. पुण्याचा सॉफ्टवेअर उद्योगाची उलाढाल आणि निर्यात आज दोन लाख कोटींवर आहे. दरम्यान, सध्या हिंजवडी IT पार्कमध्ये काम करणाऱ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.