Pune Top 10 Affordable Localities Cheapest Place : पुणे महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमाकांचे सर्वात लोकप्रिय शहर आहे. पुणे हे शहर विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. यामुळे पुण्यात शेकडो महाविद्यालये आहे. तसेच पुणे शहर महाराष्ट्रातील सर्वात मोठे आयटी हब आणि औद्योगिक क्षेत्र म्हणून विकसीत होत आहे. यामुळे पुण्यात अनेक आयटी कंपन्या तसेच हजारो औद्योगिक कंपन्या आहेत. यामुळे शिक्षण आणि नोकरीच्या निमित्ताने हजोर लोक पुण्यात येतात. यामुळे पुण्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक वसाहती निर्माण होत आहेत. यामुळे पुण्यात घरांची मागमी देखील वाढली आहे. जाणून घेऊया पुण्यातील सर्वात स्वस्त एरिया कोणत्या.
पुणे शहर हे झपाट्याने विकसीत होत असलेले शहर आहे. यामुळे मुंबई प्रमाणेच पुण्यातही घरांच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. पुणे शहर मेट्रो सिटी म्हणून ओळखले जाते.मुंबई प्रमाणे पुण्यात देखील अनेक उच्चभ्रू परिसर आहेत. इथं अनेक श्रीमंत व्यक्ती राहतात.
हडपसर, निगडी, येरवडा, डेक्कन रोड, नाना पेठ, लक्ष्मी रोड, तुळशीबाग या पर्यांयसह अनेक पर्यांय आहे जिथे कमी बजेट मध्ये भाड्याने तसेच विकत घर खरेदी करता येईल. या सर्व एरियांमध्ये उत्कृष्ट कनेक्टिव्हिटी, उच्च दर्जाच्या सुविधा तसेच उत्तम राहणीमान मिळते.
शिक्षण घेणारे विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिकांकरिता सर्वोत्तम ठिकाण आहे. कात्रज हे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 जवळ आहे. हा महामार्ग कोल्हापूर आणि बंगळुरूला जोडते. कात्रज हे राजीव गांधी प्राणी उद्यान आणि कात्रज तलावासाठी प्रसिद्ध आहे.
कात्रजमध्ये परवडणाऱ्या किमतीत निवासी फ्लॅट्स उपलब्ध आहेत.
हिंजवडी हे पुण्याचे सर्वात मोठे आयटी हब आहे. हिंजवडीतील आयटी हबमुळे पुण्याचा विकास जलद झाला आहे. येथे अनेक जण शेअरिंग बेसिसवर राहणे पसंत करतात. यामुळेच पुण्यात फ्लॅट भाड्याने घेण्यासाठी हे सर्वात स्वस्त ठिकाणांपैकी एक आहे. हिंजवडीमध्ये विद्यार्थ्यांसाठी किफायतशीर दरात अनेक पीजी आणि सह-राहण्याची जागा उपलब्ध आहेत.
पुण्यातील धनकवडी परिसरात सर्वोत्तम महाविद्यालये आहेत. दरवर्षी हजारो विद्यार्थी येथे शिक्षणासाठी येतात. राष्ट्रीय महामार्ग 4 जवळ असलेल्या धनकवडी येथे परवडणारे पीजीएस आणि शेअरिंग आधारावर भाड्याने अगदी सहज फ्लॅट्स उपलब्ध होतात.
मुठा नदीच्या काठावर वसलेला वारजे हा एरिया शहराच्या मध्यभागी आहे. म्हणजेच मुख्य सिटी पासून 12 किमी अंतरावर आहे. वारजे येथे असलेल्या परवडणाऱ्या निवासी क्षेत्रांमुळे, बरेच लोक येथे भाड्याने घर घेण्यास प्राधान्य देतात.
भोसरी हे पुण्यातील एक प्रसिद्ध औद्योगिक क्षेत्र आहे. येथे टाटा मोटर्स, थरमॅक्स, एमआयडीसी इत्यादी काही प्रसिद्ध उद्योग आहेत. परवडणाऱ्या किमती आणि औद्योगिक क्षेत्राच्या जवळ असल्याने येथे मोठ्या प्रमाणात नागरी वसाहती असून, कमी दरात घरे उपलब्ध होतात.
भूगाव परिसर मुंबई-पुणे एक्सप्रेस वे जवळ आहे. राहण्यासाठी पुण्यातील परवडणारा परिसर आहे.
लोहेगाव हा पुणे विमानतळाजवळील एक परवडणारा परिसर आहे. पुणे-अहमदनगर महामार्ग आणि पुणे-सोलापूर महामार्गाने हा परिसर शहराच्या इतर भागांशी चांगल्या प्रकारे जोडलेला आहे. येथे कमी दरात घर मिळते.
कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत, वाघोली हे पुणे-अहमदनगर महामार्गाशी जोडलेले आहे. येथे देखील अगदी सहज बजेटमध्ये घर मिळते.
खराडी हे पूर्व पुण्यातील एक परवडणाऱ्या एरियांपैकी एक आहे. कुटुंबे आणि तरुण व्यावसायिकांसाठी भाड्याने घर मिळण्यासाठी हे एक लोकप्रिय स्वस्त क्षेत्र आहे.
चाकण हे पश्चिम पुण्यातील नाशिक पुणे एक्सप्रेस वे ला लागून असलेला सर्वात लोकप्रिय एरिया आहे. येथे अगदी कमी किंमतीत अलिशान घर मिळेल.