Shiv Chhatrapati Movie Shooting In Satara : महाराष्ट्रात मोठी दुर्घटना घडली आहे. साताऱ्यात 'शिव छत्रपती' चित्रपटाचे शुटींग सुरु असताना कलाकार नदीत बुडाला आहे. चित्रकरण करणाऱ्या टीमकडून स्थानिक प्रशासनाच्या मदतीने सौरभचा शोध घेण्यात आला. रात्री उशीरा पर्यंत का कलाकाराचा शोध घेतला जात होता.
साताऱ्यातील संगम माहुली या ठिकाणी ही दुर्घटना घडली आहे. अभिनेते रितेश देशमुख यांचा राजा शिव छत्रपती या चित्रपटाचे या संगम माहुली या ठिकाणी चित्रीकरण सुरू आहे. या चित्रीकरणानंतर या चित्रपटात काम करणारा एका सह कलाकाराचा कृष्णा नदीत बुडाला आहे.
सौरभ शर्मा असे या सह कलाकाराचे नाव असून कृष्णा नदीतील पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्याचा डोहात हा कलाकार बुडाला आहे. यानंतर त्याचा शोध घेण्यात आला मात्र अंधार पडल्याने आत्ता शोध मोहीम थांबविण्यात आली. अभिनेता रितेश देशमुख हा 'शिव छत्रपती' या चित्रपटाचा दिग्दर्शक आहे. रितेश दिग्दर्शन करत असलेला हा दुसरा सिनेमा आहे.
अखिल भारतीय बैलगाडा शर्यत संघटनेने बैलगाडा शर्यती दरम्यान बैलगाडा चालकाला हेल्मेट घालणं सक्तीचं केलं आहे. याबाबत पश्चिम महाराष्ट्रातील साताऱ्यात या हेल्मेट सक्तीचं समर्थनच बैलगाडा चालक आणि संघटनेच्या लोकांनी केलं आहे. बैलगाडा शर्यती दरम्यान दुखापत होऊन अनेकदा बैलगाडा चालक जखमी होतात त्यामुळे बैलगाडा चालकांना हेल्मेट घालणं त्याचबरोबर त्यांचा विमा उतरवून हे देखील सक्तीने केलं जावं अशी मागणी बैलगाडा चालक संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.