Top 5 Rich People in Pune : विद्येचे माहेरघर, सांस्कृतिक शहर आणि उद्योगनगरी अशी पुणे शहराची ओळख बनली आहे. पुणे शहर हे देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला टक्कर देते. पुणे हे महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत शहर आहे. याच पुण्यात भारतातील अनेक उद्योगपती राहतात. पुण्यातील पहिल्या क्रमाकांच्य श्रीमंत व्यक्तीचे नाव भारतातील टॉप 10 श्रीमतांच्या यादीत चौथ्या स्थानी आहे. जाणून घेऊय पुण्यातील Top 10 श्रीमंत व्यक्ती आहेत.
लस निर्मिती करणारी कंपनी सीमर इन्स्टीट्यूटचे मालक असलेले सायरस पूनावाला हे पुण्यातील पहिल्या क्रमाकांचे श्रीमंत व्यक्ती आहेत. सीरम इन्स्टिट्यूटचे मालक सायरस एस. पूनावाला आणि कुटुंब एकूण 2.90 लाख कोटी रुपयांच्या संपत्तीचे मालक आहेत. भारतातील श्रीमंताच्या सायरस पूनावाला यादीत तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहेत. सीरमचे सीईओ आणि सायरस पूनावाला यांचा मुलगा आदर पूनावाला यांच्या नेतृत्वाखाली, कंपनीने कोविड-19 लस तयार केली. Covishield ही कोरोना महामारीच्या काळात भारतात सर्वाधिक वापरली गेलेली लस आहे.
हुरुन इंडिया 2024 च्या यादीनुसार भारतातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत असलेले 14 श्रीमंत व्यक्ती पुण्याच्या आहेत. अभयकुमार फिरोदिया आणि बाबा कल्याणी हे पुण्यातील श्रीमंत व्यक्ती आहेत. 2024 मध्ये फिरोदिया आणि कुटुंबाची संपत्ती 107 वाढून 43000 कोटी रुपयांवर पोहोचली तर बाबा कल्याणी आणि कुटुंबाची संपत्ती 68 टक्क्यांनी वाढून 31200 कोटी रुपयांवर पोहोचली. अभयकुमार फिरोदिया यांच्या बजाज फिनसर्व्हस कंपनीचा मोठा टर्न ओव्हर आहे.
पुण्यातील Top 10 श्रीमंत व्यक्ती रिअल इस्टेट, औद्योगिक उत्पादने, सॉफ्टवेअर आणि सेवा, रिटेल, एफएमसीजी आणि ऑटोमोबाईल आणि ऑटो कंपोनेंट्ससह विविध श्रेत्रात काम करतात. फर्स्टक्रायचे संस्थापक सुपम माहेश्वरी , कोलते-पाटील डेव्हलपर्सचे कार्यकारी संचालक राजेश पाटील, क्विक हील टेक्नॉलॉजीजचे संस्थापक कैलाश आणि संजय काटकर आणि वेंकीज इंडियाचे प्रवर्तक बी. वेंकटेश राव यांची नावे पुण्यातील Top 10 श्रीमंत व्यक्तींच्या यादीत आहेत.