Marathi News> विश्व
Advertisement

ईदच्या मुहूर्तावर ओमानमधील १७ भारतीय कैद्यांना 'शाही माफी'

जगभरात गेल्या आठवड्यात ईद उत्साहात साजरी करण्यात आली

ईदच्या मुहूर्तावर ओमानमधील १७ भारतीय कैद्यांना 'शाही माफी'

नवी दिल्ली : ओमानचे सुलतान कबूस यांनी आपल्या देशात शिक्षा भोगणाऱ्या १७ भारतीयांना 'शाही माफी' देण्याचा निर्णय जाहीर केलाय. ईदच्या मुहूर्तावर त्यांनी हा निर्णय जाहीर केला. भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी ओमानच्या राजाचे या निर्णयाप्रती आभार व्यक्त केलेत. 'ईद उल फित्र'च्या निमित्तानं माननीय ओमानचे राजे सुलतान कबूस यांच्या दयाळूपणाची आम्ही प्रशंसा करतो' असं ट्वटि एस. जयशंकर यांनी केलंय. 

तर, 'भारत सरकार एका मित्रदेशानं दाखवलेल्या करुणेच्या भावनेची प्रशंसा करत आहे' असं ट्विट ओमानमधील भारतीय दूतावासानं केलंय. जगभरात गेल्या आठवड्यात ईद उत्साहात साजरी करण्यात आली.

Read More