Marathi News> विश्व
Advertisement

18 चाकांच्या ट्रकची गाडीला धडक... कारचा चक्काचूर तर महिला अडकली...

18 चाकांच्या ट्रकनं कारला चिरडलं... आत असलेल्या महिलेचं काय झालं असेल याचा तुम्ही हे फोटो पाहून विचारही करू शकणार नाही....

18 चाकांच्या ट्रकची गाडीला धडक... कारचा चक्काचूर तर महिला अडकली...

वॉशिंग्टन: एखाद्या मोठ्या भीषण अपघातातून वाचणं म्हणजे चमत्कारापेक्षा कमी नाही. दैव बलवत्तर म्हणावं तरी थोडंच आहे. 18 चाकी ट्रकने कारला भीषण चिरडलं. या भीषण अपघतात कारमध्ये असलेली 46 वर्षांची महिला वाचली. या कारने अक्षरश: कारचा चुराडा केला होता. तरीही या भीषण अपघातातून महिला वाचली आहे.

18 चाकं असलेल्या ट्रकने कारला जोरात धडक दिली. या अपघातात ट्रकने अक्षरश: कारला चिरडलं. या कारचा चक्काचूर झाला. या गाडीमध्ये एक महिला होती. जी गाडी चालवत होती. एक व्यक्तीनं ट्वीट करत या अपघाताची माहिती सोशल मीडियावर पोस्ट केली. 

युझरने म्हटलं की एवढा भीषण अपघात यापूर्वी कधीही पाहिली नव्हता. कारच्या आतून महिलेचा आवाज ऐकू येत होता. मात्र कारचा चुराडा झाल्याने ती कारमध्ये अडकली होती. 14 वर्षांच्या करियरमध्ये पहिल्यांदी असा अपघात पाहिल्याचं स्टेट ट्रूपर रॉकी ओलिफंत यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. 

या अपघाताचं वर्णन शब्दात करणं खूप कठीण आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महिला जखमी झाली आहे. तिला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. ही धक्कादायक घटना वॉशिंग्टन मंगळवारी स्केगिट रिवर ब्रिजवर झाल्याची माहिती मिळाली आहे.

Read More