Marathi News> विश्व
Advertisement

ख्रिसमसच्या आधी अमेरिकेमध्ये गोळीबार

क्रिसमसच्या आधी अमेरिकेतील शिकागो शहरामध्ये गोळीबार झाला आहे.

ख्रिसमसच्या आधी अमेरिकेमध्ये गोळीबार

शिकागो : क्रिसमसच्या आधी अमेरिकेतील शिकागो शहरामध्ये गोळीबार झाला आहे.

गोळीबारामध्ये २ लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आता समोर येत आहे. तर ११ लोक जखमी झाल्याची माहिती आहे. नार्थवेस्ट भागात एका २१ वर्षीय तरुणाने हा गोळीबार केला असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

हा गोळीबार का केला याबाबत अजून कोणतीही माहिती मिळालेली नाही. पण ख्रिसमस उत्सवादरम्यान अमेरिकेत आयसीसकडून दहशतवादी हल्ल्याची शक्यता सुरक्षा यंत्रणांनी वर्तवली होती. पण हा दहशतवादी हल्लाच आहे का याबाबत अजून काहीही स्पष्ट झालेलं नाही.

Read More