Marathi News> विश्व
Advertisement

26 वर्षांची तरुणी फक्त 'या' कारणांसाठी बनते प्रेग्नेंट, स्वतःच्या दोन मुलांना 10 लाखात विकलं! कारण जाणून तुमचे रक्त खवळेल

Shocking News: चीनमधील एका कलियुगातील आईने तिच्या मुलांना  10 लाख रुपयांना विकले. याची स्टोरी आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  

26 वर्षांची तरुणी फक्त 'या' कारणांसाठी बनते प्रेग्नेंट, स्वतःच्या दोन मुलांना 10 लाखात विकलं! कारण जाणून तुमचे रक्त खवळेल

Mother sells sons for 10 Lakh Rupees: चीनमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका 26 वर्षांच्या महिलेने स्वतःच्या दोन मुलांना विकून तब्बल 10 लाख रुपये उचलले आहेत. ही घटना सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे तिने हे पाऊल गरिबी किंवा मजबुरीतून नाही, तर अतिशय वेगळ्या कारणामुळे उचले आहे. हे कारण ऐकून तुमची तळपायाची आग मस्तकात जाईल. 

'या' कारणासाठी केली मुलांची विक्री 

ही महिला कुठलाही अपराधीपणा किंवा पश्चात्ताप न दाखवता अगदी बिनधास्तपणे म्हणाली, "लाइव्ह स्ट्रीमिंगमध्ये टिप द्यायच्या होत्या, महागडे कपडे घ्यायचे होते, त्यामुळे मी मुलांना विकलं." तिच्या या बेशरम उत्तरामुळे सोशल मीडियावर लोकांचा संताप उफाळून आला आहे.

लोक करत आहेत न्यायाची मागणी

ही कहाणी एखाद्या सिनेमातली वाटावी अशी आहे, पण ही कटू वास्तव आहे. लोक या महिलेविरोधात तिरस्कार व्यक्त करत असून, तिच्या मुलांसाठी न्यायाची मागणी करत आहेत.

पैसे मिळवण्यासाठी जानबूजून गरोदर राहते

या महिलेचं नाव 'हुआंग' असून ती गुआंग्शी प्रांतातील रहिवासी आहे. तिचं शिक्षण केवळ प्राथमिक शाळेपर्यंतच झालं आहे. लहान वयातच तिला दत्तक घेतलं गेलं होतं, पण नीट शिक्षण व योग्य संस्कार मिळाले नाहीत. पुढे तिने फुजियान प्रांतात स्थलांतर केलं आणि तिथे लहान-मोठी कामं करत राहिली. हुआंग सध्या फक्त पैसे मिळवण्यासाठी वेगवेगळ्या पुरुषांशी संबंध ठेवते, गरोदर राहते आणि मग बाळं जन्माला घालून त्यांना विकते. ही गोष्ट उघडकीस आल्यानंतर संपूर्ण चीनमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

पोलिसांकडे आधीच तक्रार

हुआंगविरोधात याआधीच एप्रिलमध्ये फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस तपासात हे समोर आलं की तिने आपल्या दोन्ही मुलांना विकलं असून, हे फक्त लक्झरी लाइफ जगण्यासाठी केलं. सध्या सोशल मीडियावर ही घटना चर्चेचा विषय ठरली आहे आणि लोक या निर्दयी महिलेविरोधात कठोर कारवाईची मागणी करत आहेत.

Read More