Marathi News> विश्व
Advertisement

अमेरिकेत सर्वाधिक धोका, कोरोनाबाधितांची संख्या ४५ लाखांच्या घरात

 जगाची कोविड-१९ची संख्या १ कोटी ६९ लाख,१८ हजार दोन झाली आहे. आतापर्यंत ६ लाख ६३ हजार ५७० लोकांचा बळी गेला आहे. नव्याने १७ हजार ६८९ रुग्णांची भर तर १ हजार ८७ जणांचा मृत्यू झाला आहे.  

अमेरिकेत सर्वाधिक धोका, कोरोनाबाधितांची संख्या ४५ लाखांच्या घरात

वॉशिंग्टन : जगाची कोविड-१९ची संख्या १ कोटी ६९ लाख,१८ हजार दोन झाली आहे. आतापर्यंत ६ लाख ६३ हजार ५७० लोकांचा बळी गेला आहे. नव्याने १७ हजार ६८९ रुग्णांची भर तर १ हजार ८७ जणांचा मृत्यू झाला आहे. एकट्या अमेरिकेत कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा हा ४५ लाखांच्या घरात पोहोचला आहे. त्यामुळे अमेरिकेत तीव्र चिंता व्यक्त होत आहे. दरम्यान, अमेरिकेत कोविड व्हॅक्सीनची चाचणी  करण्यात येत आहे. तिसऱ्या टप्यात ही चाचणी आली आहे.

अमेरिकेत  आतापर्यंत ४४ लाख ९८ हजार ३४३ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर १ लाख ५२ हजार ३२०  जणांचा मृत्यू झाला आहे. वर्ल्डोमीटर (worldometers) या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. अमेरिकेत मंगळवारी ६४ हजार ७२९ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर १२४५ जणांचा मृत्यू झाला आहे. 

जगातील सर्वाधिक कोविड-१९ बाधित अमेरिकेत आहेत. त्यानंतर ब्राझील आणि भारताचा क्रमांक लागतो. अमेरिकेत दररोज जवळपास ६० हजार नवे रुग्ण आढळत असल्याने तेथील परिस्थिती चिंताजनक बनली आहे. ४४.९८ लाख कोरोना रूग्णांपैकी २१ लाख ८५ हजार ८९४ रुग्ण या आजारातून बरे झाले असून, अजूनही २१लाख ६० हजार १२९ ॲक्टिव्ह केसेस आहेत. त्यामधील १८हजार ९९२ रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे.

अमेरिकेतील कॅलिफोर्नियात कोरोनाचा फैलाव जास्त आहे. याठिकाणी ४ लाख ७४ हजार ९०३ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.  तर ८७१४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर न्यूयॉर्कमध्ये ४ लाख ४१ हजार ४३५३ जणांना बाधा झाली आहे. ७ हजार ७१९ रुग्ण दगावले आहेत. याशिवाय न्यू जर्सी, टेक्सास, इलिनॉयस आणि फ्लोरिडातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे अमेरिकेत ४५ लाखांचा आकडा काही तासात पार होईल, अशी  भीती व्यक्त होत आहे.

Read More