Marathi News> विश्व
Advertisement

हे घडलं कसं? 46,000 वर्षांनंतर बर्फात जिवंत सापडला चमत्कारी जीव, अजब प्रकार पाहून शास्त्रज्ञांनाही बसला धक्का

46000 Years Old Worm: सायबेरियात 46,000 वर्ष जुन्या एका बर्फात शास्त्रज्ञांना एक छोटासा किडा सापडला होता. या किड्याला पुन्हा पुर्रजिवीत करण्यात आले.

हे घडलं कसं? 46,000 वर्षांनंतर बर्फात जिवंत सापडला चमत्कारी जीव, अजब प्रकार पाहून शास्त्रज्ञांनाही बसला धक्का

46000 Years Old Worm: जरा विचार करा... एखादा जीव 46 हजार वर्षापर्यंत झोपलेला असेल आणि अचानक जिवंत झाला तर. एखाद्या सिनेमाच्या कथेला लाजवेल अशी घटना घडली आहे. सायबेरियामध्ये साचलेल्या बर्फात शास्त्रज्ञांना एक अगदी छोटासा जीव सापडला आहे. हा जीव हजारो वर्षापर्यंत बर्फात अडकला होता. या किड्याला पुन्हा जिवंत करण्यात आले असून या किड्याने आता पिल्लांना जन्मदेखील दिला आहे.

46,000 वर्ष जुना जीव

रिपोर्टनुसार, 2018 मध्ये रशियाच्या वैज्ञानिकांना सायबेरियाच्या बर्फाळ जमिनीच्या जवळपास 131 फुट खोल खड्ड खणला. तिथे एक प्राचीन बीळ सापडले. तिथे दोन प्रकारचे छोटे किडे नोमाटोड्स लपलेले होते. यातील एक गोल कीडा (roundworm) क्रिप्टोबायोटिक स्टेटमध्ये होता. ज्याचा अर्थ पूर्णपणे जिवंतही नाही आणि पूर्णपणे मेलेलाही नाही. त्याचे शरीर जवळपास निद्रावस्थेतच आहे. रशियाचे वैज्ञानिक अनास्तासिया शातिलोविच यांनी त्या किड्याला हळूहळू पाण्याच्या सहाय्याने पुर्नजिवीत केले (rehydrate) त्यानंतर अशा 100 किडे असे जमा करुन जर्मनीतील लॅबमध्ये पाठवण्यात आले. तिथे वैज्ञानिकांनी त्यावर संशोधन करुन त्याच्या आजूबाजूची माती आणि रोपांना रेडियोकार्बनची चाचणी करण्यात आली. या चाचणीत कळले की हा किडा 45,800 ते 47,700 वर्ष जुना आहे. म्हणजे या किडा त्या काळातील आहे जेव्हा पृथ्वीवर मॅमथ आणि सॅबर टूथ टायगरसारखे प्राणी अस्तित्वात होते. 

नवी प्रजाती, नवीन नाव

या किड्याची डिएनए चाचणी केल्यानंतर लक्षात आले की, ही प्रजाती कोणत्याही ओळखीच्या प्रजातीशी जुळत नाहीये.  यासाठी वैज्ञानिकांनी याचे नाव पैनाग्रोलाईमस कोलिमाएंसिस (Panagrolaimus kolymaensis) ठेवले आहे. हे नाव सायबेरियातील कोल्यमा नदीच्या खोऱ्यावरुन ठेवण्यात आले आहे. 

कसा जिवंत राहिला हा किडा? 

संशोधकांच्या म्हणण्यानुसार, या किड्यामध्ये एक खास क्षमता आहे की तो एका विशेष प्रकारच्या Trehalose पासून बनवतो. जो शरीरातील पेशींचे बर्फ आणि कोरड्या हवामानानुसार संरक्षण करण्यास मदत करते. जेव्हा हे कीटक प्रथम हलके वाळवले गेले आणि नंतर -80°C वर गोठवले गेले, तेव्हा त्यांच्या जगण्याची शक्यता अनेक पटींनी वाढली.

Read More