Marathi News> विश्व
Advertisement

53 वर्षाची महिला 18 वर्षांनी लहान असलेल्या तरुणाच्या प्रेमात; 24 वर्ष ज्याच्यासह संसार केला त्या नवऱ्याला सोडले आणि...

53 वर्षाची ती आणि 35 वर्षाचा तो. दोघांच्या वयामध्ये 18 वर्षांच अंतर. प्रेमात बुडालेल्या या महिलेने 24 वर्षांचा संसार एका झटक्यात विस्कटून टाकला आहे.  

53 वर्षाची महिला 18 वर्षांनी लहान असलेल्या तरुणाच्या प्रेमात;  24 वर्ष ज्याच्यासह संसार केला त्या नवऱ्याला सोडले आणि...

Extramarital Affair :  प्रेमाला वयाचं बंधन नसत असं म्हणतात. मात्र, एका महिलेने या बंधनाच्या कल्पनेपेक्षा वेगळे प्रेम केले आहे.  53 वर्षाची महिला तिच्या पेक्षा 18 वर्षांनी लहान असलेल्या तरुणाच्या प्रेमात पडली आहे. प्रेमासाठी या महिलेने 24 वर्ष ज्याच्यासह संसार केला त्या नवऱ्याला आणि मुलांना देखील सोडले आहे.  ब्रिटनमध्ये अजब प्रेमाची गजब काहानी पहायला मिळाली आहे. 

एना जॉन्सन असे या महिलेचे नाव आहे. 53 वर्षाची एना तिच्या निम्म्या  वयाच्या म्हणजेच  35 वर्ष वय असलेल्या तरुणाच्या प्रेमात पडली आहे. जॉन पॉल असे या तरुणाचे नाव आहे. जॉनच्या प्रेमात या महिलेने तिचा संसार मोडला आहे. 
पतीला पत्र लिहून सगळं सांगितले

एना ही विवाहित असून तिच्या लग्नाला 24 वर्ष झाली आहेत. तिला दोन मुलं देखील आहेत. जॉनच्या प्रेमात पडल्यानंतर तिने त्याच्यासोबतच राहण्याचा निर्णय घेतला. तिने तिच्या नवऱ्याला एक पत्र लिहून जॉन आणि तिच्या बद्दल सांगितले. तसेच जॉनशी लग्न करण्यासाठी तिने नवऱ्याकडे घटस्फोट देखील मागितला. 24 वर्ष ज्याच्यासह संसार केला त्या नवऱ्यासोबतचे नाते तिने अवघ्या काही क्षणात मोडले आहे.

अशी झाली ओळख

एना आणि जॉन यांची ऑनलाईन ओळख झाली. यानंतर दोघांची मैत्री झाली आणि त्याचे रुपांतर प्रेमात झाले. दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. जॉन हा ड्रायव्हरचे काम करतो. पतीसोबत घटस्फोट झाल्यानंतर एना आणि जॉन दोघेही एकत्र राहत आहेत. 

एना आणि जॉनच्या प्रेमाला विरोध

एना आणि जॉन यांच्या प्रेमाला विरोधाचा सामना करावा लागला. एनाची दोन्ही मुलांना तिचे हे प्रेमप्रकरण पटले नाही. त्यांनी एना आणि जॉन यांच्या लग्नाला विरोध केला. मात्र, एना तिच्या निर्णयावर ठाम राहिली आणि तिने जॉनसोबत लग्न केले. जॉनचे देखील आधी लग्न झालेले आहे. त्याला दोन वर्षांची मुलगी आहे. 

एनाचे तिच्या पतीवर गंभीर आरोप

घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर एनाने तिच्या पतीवर गंभीर आरोप केले. माझा पती माझ्यावर अजिबात प्रेम करत नाही. आम्ही एकत्र राहूनही फक्त रुममेट सारखे राहतो. पतीच्या अशा वागण्यामुळे मी खूप एकटी पडली होती. अशा स्थितीत जॉनने मला सोबत केली. 

Read More