Marathi News> विश्व
Advertisement

Video: फ्लाइटमध्ये महिला कर्मचाऱ्याला दिसली शिक्षिका, मग काय झालं तुम्हीच पाहा

सोशल मीडियावर रोज कोणता ना कोणता व्हिडीओ व्हायरल होत असतो. काही व्हिडीओ पाहिल्यावर अंगावर शहारा येतो. तर काही व्हिडीओ पाहून भावूक होतो. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. विमानातील एक महिला कर्मचाऱ्याला अचानक 30 वर्षापूर्वी शाळेत शिकवत असलेल्या शिक्षिका दिसते. 

Video: फ्लाइटमध्ये महिला कर्मचाऱ्याला दिसली शिक्षिका, मग काय झालं तुम्हीच पाहा

Lady Meet Her Old School Teacher: सोशल मीडियावर रोज कोणता ना कोणता व्हिडीओ व्हायरल होत असतो. काही व्हिडीओ पाहिल्यावर अंगावर शहारा येतो. तर काही व्हिडीओ पाहून भावूक होतो. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. विमानातील एक महिला कर्मचाऱ्याला अचानक 30 वर्षापूर्वी शाळेत शिकवत असलेल्या शिक्षिका दिसते. त्यानंतर तिने जे काही केलं ते पाहून तुम्हीही आश्चर्यचकीत व्हाल. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर अनेक युजर्सनी शेअर केला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा व्हिडीओ टोरंटो ते लॉस एंजेलिस या फ्लाइटमधील आहे. युजर्सने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, लोरी नावाची फ्लाइट अटेंडंट नुकतीच तिच्या तीस वर्षांपूर्वीच्या शालेय शिक्षिकेला विमानात भेटली. ओकोनेल असे या शिक्षिकेचं नाव आहे.

व्हिडीओमध्ये दिसत आहे की, महिला कर्मचारी तीस वर्षांनंतर तिच्या शिक्षिकेला भेटण्याचा बहुमान मिळत असल्याची घोषणा करते आणि ती या फ्लाइटमध्ये उपस्थित आहे. हे ऐकताच लोकं हैराण होऊन इकडे तिकडे पाहू लागतात. यानंतर ती स्टाफ फ्लाइटच्या आत धावते आणि तिच्या शिक्षिकेपर्यंत पोहोचते.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

फ्लाइटमध्ये मागच्या शीटवर एक वृद्ध महिला बसलेली असते आणि तीच महिला तिची शिक्षिका असते. अटेंडंट त्यांच्या जवळ येताच दोघं मिठी मारतात. ती त्यांच्या तब्येतीचीही विचारपूस करते आणि दोघेही भावूक होतात. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ कोणतरी चित्रित करून सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.

Read More