Marathi News> विश्व
Advertisement

MRI सुरु असताना गळ्यात घातली होती धातूची चेन, मशीनने आत खेचलं अन् अखेर....; रुग्णालयातील धक्कादायक घटना

गळ्यात धातूची चेन घालून एमआरआय होणाऱ्या रुममध्ये शिरणं एका व्यक्तीला चांगलंच महागात पडलं आहे. गळ्यात चेन घातली असल्याने तो एमआरआय मशीनमध्ये खेचला गेला.   

MRI सुरु असताना गळ्यात घातली होती धातूची चेन, मशीनने आत खेचलं अन् अखेर....; रुग्णालयातील धक्कादायक घटना

एमआरआय  सुरु असताना गळ्यात चेन घालणं 61 वर्षीय व्यक्तीला चांगलंच महागात पडलं आहे. अमेरिकेच्या लाँग आयलँड येथे ही घटना घडली आहे. गळ्यात चेन घातली असल्याने एमआरआय मशीन त्यांना आतमध्ये खेचत राहिली. NBC 4 New York च्या रिपोर्टनुसार, 61 वर्षीय व्यक्ती गळ्यात धातूची चेन गळ्यात घालून एमआरआय स्कॅन सुरु असलेल्या रुममध्ये गेला होता. 

रिपोर्टनुसार, एमआरआय मशीनमधील शक्तिशाली चुंबकाने साखळी ओढली आणि त्या व्यक्तीला स्कॅनरकडे ओढले. अधिकाऱ्यांनी सांगितलं की यामुळे वैद्यकीत आणीबाणी निर्माण झाली होती. मात्र त्याच्या स्थितीबद्दल किंवा नेमक्या दुखापतींबद्दल इतर कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. 

बुधवारी दुपारी 4.30 वाजता वेस्टबरी येथील ओल्ड कंट्री रोडवरील नासाऊ ओपन एमआरआय येथे ही घटना घडली. रुग्णालयाने 911 क्रमांकावरुन संपर्क साधला असता, अधिकारी मदतीसाठी पोहोचले होते. 

दरम्यान या घटनेनंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. "रुग्णालयात, मशीन चालू असताना सीटी आणि एमआरआयसाठी खोलीचा दरवाजा बंद करावा लागतो. रुग्णाची चाचणी होत असताना हा माणूस खोलीत घुसला होता का?," असा प्रश्न एकाने विचारला आहे. 

एकाने विचारलं की, "मशीनमध्ये असणाऱ्या रुग्णाचं काय झालं?". तर तिसऱ्याने किती भयानक घटना असल्याचं म्हटलं आहे. एकाने युनिट बंद असलं तरी चुंबक नेहमी सुरु असतं असं सांगितलं आहे. 

जखमी व्यक्तीला रुग्णालयात नेण्यात आलं. दरम्यान तो एमआरआय सेंटरमधील रुग्ण होता की स्कॅन रुममध्ये गेला होता हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. अधिकारी आता या घटनेची चौकशी करत आहेत आणि लोकांना एमआरआय मशीनभोवती सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करत आहेत. 

एमआरआय मशीनजवळ धातूच्या वस्तू प्राणघातक का ठरू शकतात:

एमआरआय (मॅग्नेटिक रेझोनान्स इमेजिंग) मशीन शरीराच्या आतील फोटो काढण्यासाठी मजबूत चुंबकांचा वापर करतात. मशीन स्कॅन करत नसतानाही चुंबकीय क्षेत्र नेहमीच चालू असते. या कारणास्तव, लोकांना कोणत्याही धातूच्या वस्तू जवळ न बाळगण्याचा सल्ला दिला जातो.

Read More