Marathi News> विश्व
Advertisement

हत्येनंतर रक्ताने माखलेल्या पॉर्न स्टारचा नग्न डान्स; रुममधील कॅमेऱ्यात कैद झाला हादरवणारा VIDEO

एका जोडप्याची हत्या केल्यानंतर पॉर्न स्टारने रक्ताने माखलेल्या अवस्थेत नग्न डान्स केल्याचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.   

हत्येनंतर रक्ताने माखलेल्या पॉर्न स्टारचा नग्न डान्स; रुममधील कॅमेऱ्यात कैद झाला हादरवणारा VIDEO

लंडनमध्ये एका जोडप्याची हत्या केल्यानंतर पॉर्न स्टारने रक्ताने माखलेल्या अवस्थेत नग्न डान्स केल्याचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. गतवर्षी जुलैमध्ये अल्बर्ट अल्फोन्सो आणि पॉल लॉन्गवर्थ यांच्या हत्येप्रकरणी मंगळवारी 35 वर्षीय कोलंबियन नागरिक योस्टिन आंद्रेस मोस्केरा याला दोषी ठरवण्यात आलं.

द न्यू यॉर्क पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, लंडनमध्ये जोडप्याची हत्या केल्यानंतर त्याचा नाचताना आणि गातानाचा व्हिडीओ याच्या आधारे मोस्केराची शिक्षा मुख्यत्वे आधारित होती. हत्येच्या दोन दिवसांनंतर, मोस्केराने अल्बर्ट अल्फोन्सो (62) आणि पॉल लॉन्गवर्थ (71) यांचे मृतदेह कापले. त्याने मृतदेहाचे काही भाग दोन सुटकेसमध्ये भरले आणि ब्रिस्टलला गेला. तिथे त्याने क्लिफ्टन सस्पेंशन ब्रिजवरून मृतदेह फेकून दिले.

पोलिसांना संशय का आला?

पोलिसांनी सुटकेसवर लिहिलेला पत्ता आढळला, जो पश्चिम लंडनमधील शेफर्ड्स बुश येथील स्कॉट्स रोडवरील पॉल आणि अल्बर्ट यांचा होता. द गार्डियनमधील वृत्तानुसार, फ्लॅटच्या आत त्यांना पॉल आणि अल्बर्टचे कापलेले डोके फ्रीजरमध्ये आढळले.

मोस्केराची पॉल आणि अल्बर्ट यांच्याशी भेट कशी झाली?

अल्बर्ट अल्फोन्सो आणि पॉल लॉन्गवर्थ यांनी पूर्वी लग्न केलं होतं. विभक्त झाल्यानंतरही ते एकमेकांचे मित्र म्हणून सोबत राहिले. ते २० वर्षं एकत्र राहिले. बीबीसीच्या वृत्तानुसार, हत्येच्या खटल्यादरम्यान अल्बर्ट लैंगिक जगात गुंतलेला असल्याचं आढळलं. तो पहिल्यांदा 2012 च्या सुमारास स्काईपद्वारे कोलंबियन नागरिक असलेल्या मोस्केराशी संपर्कात आला. 2017 पर्यंत त्याने लैंगिक व्हिडिओंसाठी त्याला पैसे देण्यास सुरुवात केली. या गोष्टी नंतर अधिक वाढत गेल्या. 

ऑक्टोबर 2023 पर्यंत त्यांची प्रत्यक्ष भेट झाली नव्हती. अल्बर्टने मोस्केराला यूकेला जाण्यासाठी आणि त्याच्या लंडनच्या घरी राहण्यासाठी पैसे दिले. या भेटीदरम्यान, मोस्केराने दावा केला की अल्बर्टने त्याच्यावर दररोज बलात्कार केला होता. दरम्यान यापूर्वी त्याने व्हिडिओ ऑनलाइन अपलोड करण्याची परवानगी देणाऱ्या संमती फॉर्मवर स्वाक्षरी केली होती.

मार्च 2024 मध्ये, अल्बर्ट त्याचा जोडीदार पॉलला कोलंबियाला घेऊन गेला आणि कार्टाजेना येथे मोस्केराला भेटण्यासाठी पैसे दिले. काही महिन्यांनंतर, मे महिन्यात, मोस्केरा यूकेला परतला आणि अल्बर्ट आणि पॉल दोघांसोबत राहिला. या मुक्कामादरम्यान, अल्बर्टने त्याच्यासाठी अनेक सोयी सुविधा उपलब्ध केल्या होत्या. 

8 जुलै 2024 रोजी मोस्केराने पॉल आणि अल्बर्टची हत्या केली. मस्केराने पॉलवर हातोड्याने वार केला, ज्यामुळे त्याची कवटी फुटली. त्यानंतर अल्बर्ट घरी येण्याची वाट पाहत असताना त्याने मृतदेह एका स्टोरेज बेडमध्ये लपवला.

अल्बर्टचा खून सेक्सचे रेकॉर्डिंग करण्यासाठी लावलेल्या कॅमेऱ्यातही रेकॉर्ड झाला. सेक्स कताना मोस्केराने अल्बर्टवर चाकूने वार केले. हत्येनंतर, रक्ताने माखलेल्या अवस्थेत तो खोलीभर नाचत होता आणि अल्बर्टच्या कॉम्प्यूटरमधून स्वतःच्या खात्यात ट्रान्सफर करण्याचा प्रयत्न करत होता.

Read More