Marathi News> विश्व
Advertisement

भविष्यात आफ्रिका खंडाचे दोन तुकडे होणार?

आफ्रिका खंडाचे भविष्यात दोन तुकडे पडतील की काय, अशी भीती व्यक्त करण्यात येतेय.

भविष्यात आफ्रिका खंडाचे दोन तुकडे होणार?

मुंबई : आफ्रिका खंडाचे भविष्यात दोन तुकडे पडतील की काय, अशी भीती व्यक्त करण्यात येतेय. केनियामध्ये सध्या एक मोठी भेग पडलीय. या भूभागाच्या हालचालींना  प्लेट टेक्टोनिक्स म्हणतात. सध्या पडलेली ही भेग त्याचाच भाग असल्याचं बोललं जातंय.

केनियाची राजधानी नैरोबी- नैऋत्य केनियामध्ये जवळपास पन्नास फुटांची भेग पडलीय. या भेगेमुळे नैरोबी-नॅरोक महामार्गाचे नुकसानही झाले आहे. काही घरंही डळमळीत झालीयत. भूगर्भात पडलेल्या या भेगेमुळे आफ्रिका खंड दुभंगेल, अशी शक्यता भूगर्भ शास्त्रज्ञांनी व्यक्त केलीय. काही काळानंतर दरी पूर्ण वाढत जाऊन आफ्रिकेचे दोन भाग पडतील असे सांगण्यात येतंय. नैरोबीमधली ही दरी १९ मार्चला दिसली ती आणखी रुंदावतच चाललीय.

 

Read More