Marathi News> विश्व
Advertisement

Ahmedabad Plane Crash: रमेश विश्वासकुमार नव्हे तर ही आहे जगातील सर्वात नशीबवान व्यक्ती; 7 वेळा मृत्यूला दिली आहे हुलकावणी

Luckiest Person In the world: अहमदाबादमधील विमान दुर्घटनेत विमानातील सर्व ठार झाले असताना, आश्चर्यकारपणे फक्त एक प्रवासी वाचला आहे. रमेश विश्वासकुमार याचं अपघातातून बचावणं एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही. दरम्यान रमेशप्रमाणे एका फ्रैने सेलाक नावाच्या व्यक्तीने 7 वेळा मृत्यूला हुलकावणी दिली होती.   

Ahmedabad Plane Crash: रमेश विश्वासकुमार नव्हे तर ही आहे जगातील सर्वात नशीबवान व्यक्ती; 7 वेळा मृत्यूला दिली आहे हुलकावणी

Ahmedabad Plane Crash:  काळ आला होता, पण वेळ आली नव्हती ही म्हण अहमदाबाद विमान दुर्घटनेतून बचावलेल्या प्रवाशासाठी खरी ठरली आहे. अहमदाबादमधील विमान दुर्घटनेत विमानातील सर्व ठार झाले असताना, आश्चर्यकारपणे फक्त रमेश विश्वासकुमार हा एकमेव प्रवासी वाचला आहे. अनेकजण तर हे एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही असं म्हणत आहेत. 625 फूट उंचीवरुन खाली कोसळल्यानंतर एअर इंडियाच्या विमानाचा स्फोट झाला होता. मात्र तरीही सीट क्रमांक 11-A वर बसलेले 40 वर्षीय रमेश बचावले. रमेश ब्रिटीश नागरिक आहे. पण जर तुम्हाला वाटत असेल की रमेश सर्वात लकी व्यक्ती आहे, तर त्याच्यापेक्षाही नशीबवान एक व्यक्ती आहे ज्यांचं नाव फ्रॅन सेलाक आहे. 1963 रोजी ते एका विमानात होते, जेव्हा त्याचं इंजिन फेल झालं होतं. फ्रॅन हवेत फेकले गेले आणि गवतावर पडले होते. विमान मात्र दुर्घटनाग्रस्त झालं आणि 19 प्रवासी ठार झाले.  

फ्रॅन सेलाक यांनी एक-दोन नव्हे तर तब्बल 7 वेळा मृत्यूला हुलकावणी दिली आहे. त्यांचं आयुष्य म्हणजे एखाद्या चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाही. हे सर्व 1962 मध्ये सुरू झाले, जेव्हा फ्रॅन ट्रेनने प्रवास करत होते. ट्रेन रुळावरून घसरली आणि बर्फाळ नदीत पडली. या दुर्घटनेत 17 जणांचा मृत्यू झाला, परंतु फ्रॅन यांच्या फक्त हाताला फ्रॅक्चर झालं. पुढच्या वर्षी, 1963 मध्ये, ते विमानात असताना त्याचे इंजिन निकामी झाले. फ्रेन हवेत फेकले गेले आणि गवताच्या ढिगाऱ्यावर पडले, तर विमान कोसळले आणि 19 प्रवाशांचा मृत्यू झाला.

7 वेळा मृत्यूच्या जबड्यातून आले बाहेर

1966 मध्ये त्यांची बस एका नदीच कोसळली, ज्यामध्ये चार लोक बुडाले होते. पण फ्रॅन पोहत बाहेर आले होते. 1970 मध्ये कार चालवत असताना, अचानक गाडीला आग लागली होती. पण यावेळीही ते बाहेर उडी मारुन जीव वाचवण्यात यशस्वी झाले. 1973 मध्ये त्यांच्या दुसऱ्या गाडीत इंधन पंपातून लीक झाल्याने आग लागली होती, पण त्यावेळीही ते बचावले. यानंतर 1995 मध्ये एका बसने त्यांना धडक दिली होती. पण यावेळी त्यांना किरकोळ दुखापत झाली होती. 1996 मध्ये त्यांची कार डोंगरावरुन खाली कोसळली होती. पण ते झाडावर उडी मारुन जीव वाचवण्यात यशस्वी झाले. 

2003 मध्ये जिंकली लॉटरी

इतक्या वेळा मृत्यूला हुलकावणी दिल्यानंतर फ्रॅन यांनी 2003 मध्ये लॉटरीमधून जवळपास 8 कोटी जिंकले आहेत. आपल्या अविश्वसनीय आणि चमत्कारिक नशीबामुळे फ्रॅन जगभरात चर्चेत असतात. त्यांना जगातील सर्वात नशीबवान व्यक्ती म्हणून ओळखलं जातं. 

Read More