Marathi News> विश्व
Advertisement

आनंदाश्रू! महिलेने 'मृत आई'शी साधला संवाद, पण हे कसं शक्य झालं?; स्वतःच सांगितलं

AI tools to talk with dead people: मृत्यू झालेल्या लोकांसोबत बोलता येतं का? तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर जाणून घ्यायचंय का? वाचा या महिलेला आलेला अनुभव 

आनंदाश्रू! महिलेने 'मृत आई'शी साधला संवाद, पण हे कसं शक्य झालं?; स्वतःच सांगितलं

Trending News In Marathi: एक महिला तिच्या आईच्या मृत्यूनंतर खूप जास्त दुखी होती. आईच्या मृत्यूनंतर ती खूप खचली होती. आयुष्यात पुढे जाण तिच्यासाठी खूप कठिण होऊन बसलं होतं. आईच्या मृत्यूचा धसका घेतला होता. मात्र, आईच्या मृत्यूनंतर कित्येक वर्षांनी महिलेने तिच्याशी संपर्क साधून संवाद साधला. हे कसं शक्य झालं? असा प्रश्न तुम्हालाही पडला आहे ना? महिलेने याबाबत सविस्तर सांगितले आहे. 

जर्मनीच्या बर्लिन येथे राहणारी सिरीन मलासने तिच्या आईला 2018 साली गमावले. किडणी फेल झाल्याने तिच्या आईचा 82 व्या वर्षी मृत्यू झाला. आईच्या निधनाच्या काही महिन्याआधीच तिने तिच्या पहिल्या बाळाला जन्म दिला होता. त्यामुळं आईला गमावण्याचे दुख तिला सहन झाले नाही. सिरीनला मोठा धक्का बसला होता. तेव्हा तिने तिच्या दुखातून बाहेर येण्याचा मार्ग शोधला. 

न्यूयॉर्क पोस्टच्या मते, आईच्या दुखातून बाहेर येण्यासाठी तिने AI (आर्टिफिशियल इंटेलीजेंस)चा मार्ग स्वीकारला. या माध्यमातून तिने कित्येक वर्षांनी तिच्या आईसोबत संवाद साधला. सीरीनची इच्छा होती की तिची आई तिच्या नातीला एकदा भेटू शकेल. कारण सिरीन सीरिया सोडून जर्मनीत राहण्यासाठी आली होती. 2015पासून ती तिच्या आईपासून वेगळी राहत होती. 

सिरीन म्हणते की, जेव्हा तुम्ही कमजोर असता तेव्हा तुम्ही सगळं काही स्वीकार करता. आईसोबत संवाद साधण्यासाठी सीरीनने प्रोजेक्ट डिसेंबर नावाच्या एका AI टूलची मदत घेतली. जे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे AI रूप तयार करते. त्यासाठी आधीच युजर्सना मृत्यू झालेल्या व्यक्तीसंबंधीत माहिती देणे गरजेचे आहे. उदा. त्या व्यक्तीचे वय, एकमेकांचे नाते, अशी सर्व माहिती एका फॉर्ममध्ये भरावी लागते. 

OpenAI च्या GPT2 द्वारे संचालित AI चॅटबॉट मृत व्यक्तींची दिलेल्या माहितीच्या आधारे एक प्रोफाइल तयार करते. युजर्स AI चॅटबॉटसोबत संवाद साधू शकतात. अॅपचे संस्थापक, जेसन रोहरर यांच्या म्हणण्यानुसार अॅपचे 3,000 हून अधिक युजर्स आहेत. या युजर्सपैकी अधिकतर लोकांनी याचा वापर आपल्या गमावलेल्या लोकांशी बोलण्यासाठी केला आहे. AIच्या मदतीने एका मुलीला पुन्हा तिच्या आईशी संवाद साधण्याची संधी मिळाली आहे. सिरीनचा हा अनुभव प्रत्येकाला अचंबित करणारा आहे. तर, अनेकांना हे पचवणेदेखील कठिण जात आहे. 

Read More