Marathi News> विश्व
Advertisement

Air India Plane Crash चौकशी रिपोर्टमुळे जगात खळबळ! भारताआधीच अमेरिकेत रिपोर्ट लीक कसा झाला? मृत पायलटवर गंभीर आरोप

 अपघाताच्या चौकशी रिपोर्टमुळे जगात खळबळ उडाली आहे. हा रिपोर्ट भारताआधीच अमेरिकेत लीक कसा झाला? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. तसेच मृत पायलटवर देखील गंभीर आरोप करण्यात आले आहेत. 

Air India Plane Crash चौकशी रिपोर्टमुळे जगात खळबळ! भारताआधीच अमेरिकेत रिपोर्ट लीक कसा झाला? मृत पायलटवर गंभीर आरोप

Ahmedabad Plane Crash, AAIB Report:  एअर इंडिया विमान अपघाताचा प्रारंभिक तपास अहवालामुळे जगात खळबळ उडाली आहे. या रिपोर्टमध्ये पायलटवर अत्यंत गंभीर आरोप करण्यात आले आहेत. तसेच ज्या पद्धतीने हा रिपोर्ट बाहेर आला त्यावर आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ज्या रात्री भारतात हा अहवाल प्रसिद्ध झाला, त्याच्या काही तास आधी अमेरिकेतूनही हीच माहिती लीक झाली होती. तिथे, वॉल स्ट्रीट जर्नलने इंधन स्विच अँगल आधीच प्रकाशित केला होता. काही तासांनंतर, भारतातील लोकांना अधिकृतपणे याबद्दल माहिती मिळाली. 

12 जून 2025 रोजी गुजरातच्या अहमदाबादमध्ये भयानक दुर्घटना घडली. सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अहमदाबादहून लंडनला जाणारं एअर इंडियाचं बोईंग विमानाने टेक ऑफ केले.  उड्डाणानंतर अवघ्या 30 सेकंदात कोसळलं.या विमानातून 242 जण प्रवासी करत होते. त्यातील 241 जणांचा मृत्यू झाला. या अपघातमुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली. 

एएआयबी अहवालाची संवेदनशील माहिती केवळ परदेशी वृत्तसंस्थेकडेच उपलब्ध नव्हती तर भारतात अधिकृत प्रकाशन होण्यापूर्वीच 'द वॉल स्ट्रीट जर्नल'ने ती प्रकाशित केली होती अशी धक्कादायक माहिती सोमर आली आहे. भारतीय जनता आणि संबंधित भागधारकांपर्यंत माहिती पोहोचण्यापूर्वीच अहवालाचे तपशील परदेशी संस्थांपर्यंत कसे पोहोचले? असा प्रश्न उपस्थित होत आहे. नागरी उड्डाण मंत्री के. राम मोहन नायडू यांना पाठवलेल्या पत्रात त्यांनी हे सर्व मुद्दे उपस्थित केले आहेत. 

विमान अपघात तपास ब्युरोच्या अहवालानुसार, विमानाने 08:08:42 UTC वाजता 180 नॉट्सचा कमाल वेग गाठताच, इंजिन 1 आणि इंजिन 2 चे इंधन कटऑफ स्विच एक-एक करून RUN वरून CUTOFF मध्ये बदलले. यामुळे, दोन्ही इंजिनची शक्ती कमी होऊ लागली.  या रिपोर्टमध्ये  मृत वैमानिकांवरील गंभीर आरोप करण्याक आले आहेत. पायलट संघटनांनीही यावर आपला आक्षेप व्यक्त केला आहे.

एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (AAIB) च्या प्रारंभिक तपास अहवालात असे दिसून आले आहे की विमानाचा इंधन स्विच 'रन' वरून 'कटऑफ' स्थितीत गेला होता, ज्यामुळे विमान कोसळले आणि या अपघातात 242 प्रवाशांसह 270 लोकांचा मृत्यू झाला. रॉयटर्सने पाहिलेल्या मेमोवर आधारित या अहवालात म्हटले आहे की विमानाने उड्डाण करण्यापूर्वी कॉकपिटमध्ये काही गोंधळ निर्माण झाला होता. अहवालात असे म्हटले आहे की विमानाच्या इंजिनचे दोन्ही इंधन कटऑफ स्विच जवळजवळ एकाच वेळी चालू केले गेले होते. यामुळे इंजिनला इंधन मिळणे थांबले. मेमोमध्ये विल्सन म्हणाले, "प्रारंभिक अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर, आम्हाला आणि जगाला प्रत्यक्षात काय घडले हे कळले. यामुळे काही गोष्टी स्पष्ट झाल्या, परंतु काही नवीन प्रश्नही निर्माण झाले." विल्सन पुढे म्हणाले, "प्रारंभिक अहवालात कोणतेही कारण उघड झालेले नाही किंवा कोणतीही शिफारस करण्यात आलेली नाही. म्हणून, मी सर्वांना विनंती करतो की घाईघाईने कोणताही निष्कर्ष काढू नका, कारण तपास अद्याप पूर्ण झालेला नाही."

दरम्यान या अपघातानंतर संयुक्त अरब अमिराती (UAE) ची राष्ट्रीय विमान कंपनी एतिहाद एअरवेजने त्यांच्या बोईंग 787 विमानांच्या वैमानिकांना इंधन स्विचबाबत काळजी घेण्याच्या सूचना केल्या आहेत. यासाठी वैमानिकांना विशेष मार्गदर्शक तत्त्वे देण्यात आली आहेत. इंधन नियंत्रण स्विच कसे काम करतात याचीही एअरलाइन चौकशी करत आहे. 

Read More