देशात सणासुदीचा हंगाम सुरू होत आहे. यासोबतच मोठ्या संख्येने लोक भारतात येतात किंवा देशात अनेकजण नातेवाईकांकडे तसेच येथे भेट देण्यासाठी विमानाने प्रवास करतात. अशातच विमान प्रवास महागणार आहे. कारण तेल मार्केटिंग कंपन्यांनी मोठा धक्का देत विमानाचे इंधन महाग केलं. ATFअर्थात एव्हिएशन टर्बाईन इंधनाच्या किंमतीत मोठी वाढ झाली. ATFमध्ये 2 हजार 677 रुपये प्रति लिटर वाढ झालीय. ATFमध्ये वाढ झाल्यानं विमान प्रवास महागणार आहे.