Marathi News> विश्व
Advertisement

कोरोना : संसर्ग हवेतून होत असल्याचे ठोस पुरावे नाहीत - जागतिक आरोग्य संघटना

सध्या जगात कोरोनाचे संकट दिवसागणिक वाढत आहे. कोरोना विषाणूवर अद्याप औषध शोधण्यात यश आलेले नाही. औषधाबाबत संशोधन सुरु आहे.  

कोरोना : संसर्ग हवेतून होत असल्याचे ठोस पुरावे नाहीत - जागतिक आरोग्य संघटना

लंडन : सध्या जगात कोरोनाचे संकट दिवसागणिक वाढत आहे. कोरोना विषाणूवर अद्याप औषध शोधण्यात यश आलेले नाही. औषधाबाबत संशोधन सुरु आहे. दरम्यान, हवेतून कोरोना विषाणूचा संसर्ग होत असल्याचा अनेक शास्त्रज्ञांनी केला होता. तसेच याबाबत जागतिक आरोग्य संघटनेने सुधारित नियम जारी करण्याची मागणी केली होती. यावर कोरोना विषाणूचा संसर्ग हवेतून होत असल्याचे ठोस पुरावे नाहीत, असे जागतिक आरोग्य संघटनेने  म्हटले आहे.

कोरोना विषाणूचा संसर्ग हवेतून होत असल्याचे स्पष्ट पुरावे नसल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या संसर्ग नियंत्रण विभागाच्या तांत्रिक प्रमुख डॉ. बेनडेट्टा अलेग्रांझी यांनी ही माहिती दिली आहे. जगभरातल्या २३९ शास्त्रज्ञांनी केलेल्या दाव्याच्या पार्श्वभूमीवर त्या बोलत होत्या. 

हवेतून पसरणारा संसर्ग दीर्घकाळ हवेत टिकून राहत नाही. त्यामुळे मास्क वापरणे आणि एकमेकांपासून १ मीटरचे अंतर ठेवणे कायम ठेवावे, असे वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद अर्थात सी.एस.आय.आर.चे महासंचालक शेखर मांडे यांनी सांगितले आहे.

Read More